मसूरच्या डाळीची खिचडी: मसूरच्या डाळीची खिचडी आपण मुख्य जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कधी कंटाळा आला की अश्या प्रकारची खिचडी झटपट बनवू शकतो. ही खिचडी बनवण्यासाठी मसूरची डाळ, तांदूळ, आले-लसून पेस्ट, गरम मसाला, कांदा वापरला आहे. खिचडी बरोबर आपण पापड व लोणचे सर्व्ह करू शकतो मग चपाती भाजी नसेल तरी चालेल.
बनवण्यसाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
The Marathi language video of this Masoor Dal Khichdi can be seen on our YouTube Channel:Maharashtrian Tasty Spicy Masoor Dal Khichdi
साहित्य:
२ कप तांदूळ (कोलम किंवा बासमती)
1/2 कप मसूर डाळ
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ टे स्पून आले=लसून पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१ १/२ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
१/४ कप कोथंबीर (चिरून)
फोडणीकरीता:
२ टे स्पून तेल
१ तमालपत्र
७-८ काळे मिरे
१ टी स्पून शहाजिरे
१ छोटा तुकडा दालचीनी
कृती:
प्रथम तांदूळ व मसूरडाळ धुवून अर्धातास बाजूला ठेवा. कांदा, कोथिंबीर चिरून घ्या. आले-लसून पेस्ट कुतू घ्या.
कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवा.करून त्यामध्ये तमालपत्र, मिरे, शहाजिरे, दालचीनी तुकडा घालून चिरलेला कांदा घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसून पेस्ट घालून परतून घेवून धुतलेले तांदूळ घालून २ मिनिट परतून घेऊन हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला,मीठ, कोथंबीर घालून मिक्स करून ५ कप गरम पाणी घालून मिक्स करून घ्या. कुकरचे झाकण लाऊन दोन शिट्या काढून घ्या.
कुकर थंड झाला की गरम गरम मसूरच्या डाळीची खिचडी साजूक तूप घालून तळलेल्या पापडा बरोबर सर्व्ह करा.
The video in Marathi on the preparatio method of this Masoor Dal Khichdi can be seen on our YouTube Channel- https://www.youtube.com/watch?v=zUWgbOKcbdo