पारंपारिक कोकणी पद्धतीची काजूची ग्रेव्ही: पारंपारिक कोकणी पद्धतीची काजूची ग्रेव्हीही एक महाराष्ट्रीयन लोकप्रिय कोकणातील ग्रेव्ही आहे. कोकण म्हंटले की आपल्या डोळ्या समोर नारळ,अंबा, पोपळी, काजूची झाडे व मोठेमोठे हिरवे गार डोंगर आपल्या डोळ्या समोर येतात.
कोकणात काजूची ग्रेव्ही बनवतांना ओले काजू वापरतात. ओल्या काजूची आमटी चवीस्ट लागते. पण आपल्याला प्रतेक वेळी ओले काजू मिळतीलच असे नाही. तर आपले नेहमीचे काजू २ तास पाण्यात भिजत घालून सुद्धा अश्या प्रकारची काजूची ग्रेव्ही बनवता येते.
काजूची ग्रेव्ही किंवा आमटी बनवतांना ओल्या नारळाचा मसाला वापरला आहे. त्यामुळे ह्याची टेस्ट अगदी खमंग लागते. जर आपल्याला चपाती बरोबर किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करायची असेल तर थोडी घट्टसर बनवता येते व जर गरमगरम भाता बरोबर सर्व्ह करायची असेलतर थोडी पातळ सुद्धा बनवता येते.
The English language version of the same Kaju Chi Bhaji recipe can be seen here – Konkani/ Maharashtrian Cashew nut Bhaji
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप काजू (पाकळी)
१ टे स्पून तेल
१ मध्यम आकाराचा कांदा
१ मध्यम आकाराचा टोमाटो
१ टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
१ टे स्पून फ्रेश क्रीम
मीठ चवीने
कोथंबीर सजावटीसाठी
मसालाकरीता (वाटण):
१ टी स्पून तेल
१ मध्यम आकाराचा कांदा, ७-८ लसून पाकळ्या
१” आले तुकडा, १ कप ओल्या नारळ (खोवलेला)
४ लाल सुक्या मिरच्या, १/२ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून जिरे, १/२ टी स्पून धने
१/३ टी स्पून हिंग, २ लवंग, १/२” दालचीनी तुकडा
४ हिरवे वेलदोडे, १ छोटी मसाला वेलची
१/२ टी स्पून खसखस, १/२ तमालपत्र, ४-५ मिरे
कृती: सर्वात पहिले काजू दोन तास पाण्यात भिजत ठेवा. जर ओले काजू असतील तर भिजत नाही ठेवायचे. कांदा, टोमाटो व कोथंबीर चिरून घ्या.
मसाला करीता: कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा थोडा परतून घ्या मग त्यामध्ये आले-लसूण व ओला खोवलेला नारळ घालून गुलाबी रंगावर परतून घेवून परतलेला नारळ कढईमधेच बाजूला करून एक टी स्पून तेल घालून त्यामध्ये लाल मिरची व खडा मसाला घालून एक मिनिट परतून घ्या. मग सर्व मिश्रण मिक्स करून एक मिनिट परतून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
काजू ग्रेव्ही करीता: कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो घालून एक मिनिट परतून घेवून भिजवलेले काजू, लाल मिरची पावडर, मीठ, वाटलेला मसाला घालून एक मिनिट परतून १/२ कप पाणी घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर मसाला शिजू द्या. गरम भासल्यास अजून १/२ कप पाणी घाला. मसाला शिजला की त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून एक चांगली वाफ येऊ द्या.
गरम गरम काजू ग्रेव्ही चपाती किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Maharashtrian Style Cashew-Nut Gravy/ Curry can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=nQkt14cUhIU