१२ ग्रेट उपयुक्त कुकींग टिप्स: 12 Great Useful Cooking Tips ह्या १२ कुकिंग टिप्स फक्त छोट्या स्वयंपाका साठी नाहीतर मोठ्या प्रमाणात कुकिंग करणाऱ्यांना सुद्धा उपयुक्त आहेत.
तुम्ही ह्या १२ कुकींग टिप्स वापरून बघा त्यामुळे तुमचा स्वयंपाक, भाज्या कश्या तुम्ही जास्त दिवस ठेवू शकाल तसेच त्याचा ताजेपणा व त्याचे व्हीटामीन सुद्धा कसे टिकवू शकाल.
The English langauge version of the same article can be seen here – 12 Most Useful Cooking Tips
१) जेव्हा आपण बीटरूट उकडून घेतो तेव्हा त्याची सर्व पाने काढून टाकतो ती न काढता १-२ पाने तशीच ठेवा त्यामुळे बीटरूट लवकर उकडले जाते.
२) आपण जेव्हा गवार ( Cluster Beans), हिरवे ताजे मटार ( Green Peas) श्रावण घेवडा ( French Beans) कुकरमध्ये शिजवायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये एक चिमुट मीठ घालावे त्यामुळे ह्या भाज्यांचा ताजेपणा व हिरवे पणा तसाच राहतो.
३) आपण वांगे चिरतो व मग भांड्यात पाणी घेवून त्यामध्ये चिरलेले वांगे घालतो, तेव्हा त्या पाण्यात १/४ टी स्पून मीठ व १/४ टी स्पून हळद घालावी म्हणजे वांग्याच्या फोडी काळ्या पडत नाहीत.
४) जेव्हा आपण गवारची भाजी बनवतो तेव्हा त्यामध्ये तीळ भाजून कुटून घालावे. गवारच्या भाजीची चव निराळीच लागते.
५) आपण भाज्या चिरतो तेव्हा फार बारीक चिरू नये. कारण की बारीक चिरल्या तर त्यातील व्हीटामीन नष्ट होतात.
६) स्वयंपाक करतांना खायचा सोडा वापरू नये. सोडा वापरल्याने व्हीटामीन नष्ट होतात.
७) जेव्हा आपण जास्त प्रमाणात लसून-आले पेस्ट बनवतो तेव्हा २:१ प्रमाण घ्यावे म्हणजेच लसूण चे प्रमाण २ व आले चे प्रमाण १ असे घ्यावे. मग मिक्सरमध्ये बारीक करतांना पाणी वापरू नये फक्त थोडेसे मीठ घालून काचेच्या बाटलीत भरून ठेवावे.
८) जेव्हा हिरव्या ताज्या भाज्या आपण आणतो तेव्हा निवडून स्वच्छ कापडात किंवा न्यूजपेपर पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्या म्हणजे जास्त दिवस टिकतील.
९) आपण नेहमी कोथंबीर जास्त प्रमाणात आणतो कारण की ती सारखी लागते. आणल्यावर ती निवडून न्यूजपेपर पेपरमध्ये ठेवून स्टेनलेस स्टीलच्या डब्यात ठेवावी ती छान ताजी रहाते.
१०) आपण सीझनमध्ये हिरवे ताजे मटार जास्त आणून ठेवतो. तेव्हा ते सोलून हवाबंद डब्यात ठेवून डीपफ्रीजमध्ये ठेवावे व आपल्याला लागेल तसे काढून थंड पाण्यात ५-१० मिनिट ठेवावे.
११) हिरवे मटार व श्रावण घेवडा कधी उकडून घेवू नये. प्रेशर कुकरमध्ये वाफेवर शिजवावे म्हणजे ते लवकर शिजतात व त्याचे व्हीटामीन नष्ट हो नाहीत.
१२) सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करायचे असतील तर खोबरे प्रथम पाण्यात भिजत ठेवावे म्हणजे पातळ काप करता येतात.