ब्लँक् ग्रेप फ्रुट पाणी पुरी: ब्लँक् ग्रेप फ्रुट पाणी पुरी ही एक छान नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून बनवू शकतो. ही एक निराळीच व चवीस्ट डीश आहे. ह्या फ्रुट पाणी पुरी मध्ये वेगवेगळ्या फळांचे ज्यूस बनवले आहेत. मी ज्यूस बनवतांना ब्लँक् ग्रेप, डाळींब व पायनापल (अननस) वापरले आहे. आपण ह्यामध्ये संत्री किंवा टरबूज (कलिंगड) चे सुद्धा ज्यूस बनवू शकतो.
ब्लँक् ग्रेप किंवा डाळींबचे ज्यूस बनवतांना पाणी, साखर, मीठ चाट मसाला व सेंधव मीठ वापरले आहे त्यामुळे त्याची चव अप्रतीम लागते.
टिप: फ्रुट पाणी पुरी बनवतांना ताजी फळे वापरा. फ्रुटचे पाणी थंड करून वापरा म्हणजे त्याची टेस्ट मस्त लागेल.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
पाणी पुरीच्या पुऱ्या १ पाकीट
पाणी पुरीचे पाणी:
२ कप काळी द्राक्षे
२ कप डाळींब दाणे
२ कप अननस तुकडे
६ टे स्पून साखर
१ टी स्पून चाट मसाला
१ टी स्पून सेंधव मीठ
१ टी स्पून लिंबूरस
१/२ कप पुदिना पाने चिरून
कृती: ब्लँक् ग्रेप चे ज्यूस बनवतांना ज्यूसर मध्ये काळी द्राक्षे, २ कप पाणी, १ टे स्पून साखर, १ टी स्पून लिंबूरस, १/४ टी स्पून चाट मसाला, चवीला सेंधव मीठ घालून त्याचे ज्यूस काढून गाळून घ्या व एका ग्लास मध्ये ओतून पुदिना पाने घालून सजवा.
डाळींबाचे ज्यूस काढतांना पाणी, साखर, मीठ व चाट मसाला घालून ज्यूस काढून गाळून घ्या व एका ग्लास मध्ये ओतून पुदिना पाने घालून सजवा.
अननसाचे ज्यूस काढतांना पाणी, साखर मीठ घालून ज्यूस काढून गाळून घ्या व एका ग्लास मध्ये ओतून घेवून पुदिना पाने घालून सजवा.
एका बाउल मध्ये थोडी फळे कापून घ्या व एका बाउल मध्ये ठेवा.
फ्रुट पाणी पुरी सर्व्ह करतांना पुरी फोडून त्यामध्ये फळाचे तुकडे घालून फळांचा ज्यूस घालून सर्व्ह करा.
फ्रुट पाणी पुरी सर्व्ह करतांना एकदम सर्व पुऱ्यामध्ये पाणी घालू नका नाहीतर पुऱ्या मऊ होतील व चांगल्या नाही लागणार.
The video in Marathi of this Pani Puri Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=N_qLOfU_hpA
Yes I tried it it’s so yummy! Thanks for sharing it.
https://www.famousbiblestories.com/