उपवासाच्या वाफवलेल्या साबुदाणा पापड्या रेसिपी: साबुदाणा पापड्या ह्या इडलीच्या साच्यात कुकरमध्ये वाफवून बनवले आहेत. हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत.
उपवासाच्या दिवशी तळून खायला छान आहेत. महाराष्ट्रमध्ये मुलीच्या लग्नात रुखवत ठेवावे लागते. त्या रुखवतात हे रंगीत पापड अगदी आकर्षक दिसतील.
साबुदाणा पापड्या बनवताना फक्त साबुदाणा भिजवून मीठ लावून वाफवून घेतले आहेत. आपण सणावाराला किंवा नाश्त्याला सुद्धा घेवू शकतो. साबुदाणा पापड्या लहान मुले सुद्धा खूप आवडीने खातात.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३६ पापड बनतात
साहित्य:
२ कप साबुदाणा
मीठ चवीने
केशरी, हिरवा रंग किंवा आपल्या आवडी नुसार
तेल इडली पत्राला लावण्यासाठी
प्लास्टिक पेपर पापड्या वाळत घालण्यासाठी
कृती:
रात्री साबुदाणा धऊन घ्या मग त्यामध्ये साबुदाणा बुडेल एव्ह्डे पाणी घालून झाकून ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा पापड करण्याच्या आगोदर भिजवलेल्या साबुदाण्याला चवी पुरते मीठ घालून मिक्स करून घेवून त्याचे तीन एकसारखे भाग करून तीन वेगवेगळ्या बाउलमध्ये ठेवावे.
मग पहिल्या बाउल मधील साबुदाण्याला १-२ थेंब लाल रंग घालून मिक्स करून घ्या. मग दुसऱ्या बाउल मधील साबुदाण्याला हिरव्या रंगाचे १-२ थेंब घालून मिक्स करून घ्या. तिसऱ्या बाउल मधील साबुदाणा पांढराच ठेवावा.
इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवा. इडली पत्राला अगदी थोडेसे तेल लावावे म्हणजे साबुदाणा चिटकनार नाही. मग इडली पात्रा मध्ये १-१ चमचा साबुदाणा घालून बोटानी एक सारखा पसरवून घ्या.
मग पत्राचे झाकण लावून १२-१५ मिनिट पापड वाफवून घ्या. थंड झाल्यावर एका प्लास्टिक पेपरवर वाळत ठेवा. मग अगदी कडकडीत उन्हात २ दिवस ठेवून पापड पूर्ण वाळल्यावर डब्यात भरून ठेवा. जेव्हा पाहिजे तेव्हा तेलात तळून सर्व्ह करा.
The video of this Sabudana Papdya for Fasting recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=xrBdV8_0Rtg