गुलकंदाचे आईसक्रिम रोझ पेटल जाम आईसक्रिम: आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे मुलांना रोज वेगवेगळ्या प्रकारचे आईसक्रिम खाण्याची इच्छा होते तर आपण आज गुलकंदचे आईसक्रिम बनवू या.
आईसक्रिम बनवण्यासाठी खूप सोपे आहे. प्रथम मी बेसिक आईसक्रिम बनवून घेतले होते त्याचा विडीओ मी आगोदर प्रकाशित केला आहे. बेसिक आईसक्रिम वापरून मी हे गुलकंदचे आईसक्रिम बनवले आहे. ह्याची टेस्ट अप्रतीम लागते. हे आईसक्रिम बनवण्यासाठी बेसिक आईसक्रिम, गुलकंद, रोझ इसेन्स, रोझ सिरप व फ्रेश क्रीम वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
डीप फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी: २ तास
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप किंवा १/४ बेसिक आईसक्रिम भाग
२ टे स्पून फ्रेश क्रीम
१ टे स्पून रोझ सिरप
१/४ टी स्पून रोझ इसेन्स
२ टे स्पून गुलकंद
कृती: प्रथम बेसिक आईसक्रिम बनवून घ्या. त्याचे साहित्य व कृती ह्या अगोदर दिली आहे ती बघू शकता त्याची लिंक खाली देत आहे.
एका जस्ताच्या भांड्यात १ कप बेसिक आईस्क्रीम घेवून त्यामध्ये फ्रेश क्रीम व रोज इसेन्स व रोझ सिरप घालून हैंड ब्लेंडरनी २-३ मिनिट मिक्स करून घ्या मग चांगले मुलायम झाले की त्यामध्ये गुलकंद घालून परत ५-१० सेकंद मिक्स करून घ्या.
मग आईसक्रिमचे भांडे डीप फ्रीजमध्ये दोन तास सेट करायला ठेवा. आईसक्रिम सेट झाल्यावर एक बाउल मध्ये काढून त्यावर थोडे गुलकंद व रोझ सिरपने सजवून मग सर्व्ह करा.
The Marathi language video of this Gulkand / Rose Petal Jam Ice Cream Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=pIMT8qu-p8w