कोहळ्याची उसरी / सांडगे: हा एक कोकणात बनवला जाणारा लोकप्रिय वाळवणाचा पदार्थ आहे.
एप्रिल, मे महिना चालू झालाकी महाराष्ट्रातील महिला अश्या प्रकारचे वाळवण बनवून ठेवतात. मग कधी घरात भाजी नसली तर ह्याचा उपयोग करून भाजी बनवली जाते, किंवा तळून खायला सुद्धा मस्त लागतात. बनवायला अगदी सोपे आहे तसेच वर्षभरा करीता बनवून ठेवता येतात.
साहित्य:
१ मध्यम आकाराचा कोहळा
१ कप दही,
१ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून मेथी पावडर
१ टे स्पून मीठ
१ टी स्पून हिंग
कृती: प्रथम कोहळा धुऊन, पुसून त्याची साले काढून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्या. मग दह्यामध्ये लाल मिरची पावडर, मेथी पावडर, मीठ व हिंग घालून मिक्स करून घ्या. मग कोहळ्याच्या फोडीना दही चोळून उन्हात वाळवत ठेवा मग परत एकदा दह्यात घालून परत वाळवाव्यात. वाळल्यावर तळून खावे.