कुरकुरीत तांदळाच्या कुरड्या: तांदळाच्या करड्या बनवायला सोप्या आहेत व कमी कष्टात बनवतान येतात. तळल्यावर छान कुरकुरीत होतात. अश्या प्रकारच्या कुरड्या झटपट होणाऱ्या आहेत.
उन्हाळा आलाकी महाराष्टीयन महिलांची वर्ष भराचे वाळवण करायची लगभग असते. मग पापड, कुरड्या व पापड्या अश्या नानाविध प्रकार बनवले जातात. आपण नेहमी गव्हाच्या कुरड्या बनवतो आता तांदळाच्या कुरड्या बनवून बघा नक्की आवडतील. महाराष्टात मुलीचे लग्न असले की रुखवत द्यायची पद्धत असते अश्या प्रकारच्या रंगीत निराळ्या कुरड्या बनवा अगदी आकर्षक दिसतील.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २५ बनतात
साहित्य:
२ कप तांदळाचे पीठ
२ कप पाणी
१ टी स्पून मीठ
२ टी स्पून तेल
रंग आपल्या आवडी नुसार
कृती: प्रथम एका भांड्यात तांदूळ धुवून पाणी घालून ३ दिवस भिजत ठेवा , रोज पाणी बदला तिसऱ्या दिवशी पाणी काढून थोडे सुकवून बारीक दळून घ्या.
कुरड्या करण्यासाठी एका जाड बुडाच्या भांड्यात २ कप पाणी घेवून त्यामध्ये मीठ व तेल घालून ढवळून घ्या. मग त्यामध्ये हळूहळू तांदळाचे पीठ घालून हलवत रहा चांगले ढवळून झाले की विस्तव बंद करून भांड्यावर झाकण ठेवा. २-३ मिनिट तसेच ठेवा.
मग एका प्लेटमध्ये थोडे थोडे उकडीचे पीठ घेवून तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या मग चकलीच्या सोरयानी शेवेची चाकी लावून प्लास्टिक पेपरवर कुरडइ घाला. सर्व कुरड्या घालून झाल्याकी कडकडीत उन्हात वाळवून घ्या. पूर्ण वाळल्यावर डब्यात भरून ठेवा.