चॉकलेट मस्तानी रेसिपी: घरच्या घरी मस्त पुण्यातील फेमस चॉकलेट मस्तानी बनवायला शिका. चॉकलेट मस्तानी ही मुलांना व मोठ्यांना आवडते. आता समर सीझनमध्ये बनवा किंवा थंडीत किंवा पावसाळा सीझनमध्ये सुद्धा बनवा.
चॉकलेट मस्तानी बनवण्यासाठी खूप सोपी व झटपट होणारी आहे. पार्टीला किंवा जेवणानंतर डेझर्ट म्हणून सर्व्ह करू शकता. ह्या आगोदर आपण पुण्याची फेमस मँगो मस्तानी कशी बनवायची ते पाहिले आता चॉकलेट मस्तानी बनवू या.
डीलीशीयस चॉकलेट मस्तानी बनवण्यासाठी दुध क्रीमचे, साखर, कोको पावडर, ड्रिंकिंग चॉकलेट, चॉकलेट आईसक्रिम, चॉकलेट सॉस व ड्रायफ्रुट/ चॉकलेटचे तुकडे सजावटीसाठी वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी वेळ: १-२ तास
वाढणी: ३ जणासाठी
साहित्य:
३ कप दुध (क्रीमचे)
२ टे स्पून साखर
२ टे स्पून कोको पावडर
२ टे स्पून ड्रिंकिंग चॉकलेट पावडर
३ स्कूप चॉकलेट आईसक्रिम
२ टे स्पून चॉकलेट सॉस
ड्रायफ्रुट सजावटीसाठी
कृती: सर्व प्रथम दुध गरम करून गार करून घ्या. मग मिक्सरच्या भांड्यात दुध, साखर, कोको पावडर, ड्रिंकिंग चॉकलेट पावडर घालून ब्लेंड करून घ्या.
डेकोरेटीव्ह काचेचे ग्लास घेवून प्रथम चॉकलेट मिल्कशेक घालून वरतून चॉकलेट आईसक्रिम व चॉकलेट सॉस घालून वरतून ड्रायफ्रुट व चॉकलेट तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.
The Marathi language video of this Chocolate Mastani recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=KY3KucRZT5I