खुसखुशीत महाराष्ट्रियन बेक्ड मँगो करंजी: आंबा हा फळांचा राजा तो सगळ्यांना खूप आवडतो. त्याचे कोणतेही पदार्थ बनवले तरी अप्रतीम लागतात. ह्या आगोदर आपण आंब्याचे आईसक्रिम, मिल्कशेक, मस्तानी, कस्टर्ड, लस्सी, मोदक आता आपण करंज्या कश्या बनवायच्या ते बघूया. अश्या प्रकारच्या करंज्या आपण सणावाराला इतर वेळी किंवा दिवाळी फराळसाठी बनवू शकतो. अगदी सोप्या व आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत कारण साजूक तूप वापरून फक्त बेक केल्या आहेत डीपफ्राय केल्या नाहीत.
आंब्याचे बरेच गुणधर्म आहेत व तो औषधी पण आहे.जेवतांना आंबा खाल्याने मेद वाढतो, हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व कफवृद्धी होत नाही. दुध मिक्स करून आंबा खाल्याने वीर्यवृद्धी चांगली होते. आंबे खाणे म्हणजे आतड्यासाठी एक प्रकारचे उत्तम प्रकरचे औषध आहे. चांगला पिकलेला आंबा खाल्याने जठरातील पचनाचे रोग, फुफुसाचे रोग तसेच रक्त कमी असणारे रोग बरे होतात. चांगले पिकलेले आंबे खाल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी होते, आळस दूर होतो व रस धातू मुबलक प्रमाणात होतो.
क्रिस्पी बेक मँगो करंजी बनवतांना सारणाकरीता ओला नारळ, आंब्याचा रस, दुध, साखर व ड्राय फ्रुट वापरले आहेत व आवरणासाठी मैदा, आंबारस, पिठीसाखर, मीठ, तूप वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
बेक करण्यासाठी वेळ: ५० मिनिट
वाढणी: १५-१७ बनतात
साहित्य:
सारणाकरीता:
१ कप ओला नारळ (खोऊन)
१ कप दुध
१ कप हापूस आंब्याचा रस
१/२ कप साखर
ड्रायफ्रुट सजावटीसाठी
आवरणासाठी:
२ कप मैदा
१ टी स्पून बेकिंग पावडर
२ टे स्पून आंब्याचा रस
१/२ कप साजूक तूप किंवा बटर
मीठ चवीने
३ टे स्पून दुध व पाणी (मिक्स)
कृती: प्रथम आंब्याचा रस काढून मिक्सरमधून काढा. ओला नारळ खोऊन घ्या.
सारणासाठी: एका जाड बुडाच्या कढईमधे ओला नारळ व दुध घालून आटवून त्यामध्ये साखर व आंब्याचा रस घालून घट्ट होई परंत आटवून घ्या मग त्यामध्ये ड्रायफ्रुट घालून मिक्स करून घ्या व मिश्रण थंड करायला ठेवा.
आवरणासाठी: मैदा व बेकिंग पावडर सपेटीच्या चाळणीने चाळून घ्या. मग एका मोठा आकाराच्या बाउलमध्ये मैदा, तूप, आंब्याच्या रस, मीठ, पिठीसाखर घालून घट्ट मळून घ्या लगेल तेव्हडे दुध व पाणी हळूहळू घालून पीठ मळून घ्या. मळलेले पीठ थोडावेळ बाजूला ठेवा.
करंजी करीता: मग मळलेल्या पीठाचे एक सारखे ओं भाग करून घ्या. एक भाग लाटून त्याच्या वाटीच्या सहायानी गोल गोल पुऱ्या कापून घ्या. एका पुरीवर एक टी स्पून सारख ठेवून पुरी मुडपून घ्या व त्याला करंजीचा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या.
एका बेकिंग ट्रेमध्ये जेव्हड्या करंज्या बसतील तेव्हड्या ठेवा. प्रथम Microwave Oven Preheat करून त्यामध्ये बेकिंग डिश oven मध्ये ठेवून १८० डिग्रीवर सेट करून २५-२८ मिनिट बेक करा. अश्या प्रकारे सर्व करंज्या बेक करून थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.
The video in Marathi of this Baked Mango Karanji can be seen ou our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=7BmL0pGNquk
Superb Diwali Faral Karanji, looks yummy and mouth watering.