दुध मँगो कुल्फी कशी बनवायची: आपण ह्या आगोदर मँगो कुल्फी कशी बनवायची ह्याचा विडीओ बघितला आता पण आपण मँगो कुल्फी बघणार आहोत पण वेगळ्या स्ताईलने.
दुध मँगो कुल्फी बनवतांना क्रीमचे दुध, क्रीम, खवा किंवा कंडेन्स मिल्क सुद्धा वापरले नाही. बरेच जणांना काही आरोग्याच्या समस्या असतात त्यामुळे त्यांना क्रीमच्या दुधाचे, क्रीमचे किंवा खव्याचे पदार्थ सेवन करता येत नाहीत किंवा हृद्यविकार असणाऱ्यांना क्रीम किंवा खवा ह्या पासून बनवलेले पदार्थ वर्ज असतात. त्याच्या साठी अश्या प्रकारची कुल्फी फायदेशीर आहे.
दुध मँगो कुल्फी बनवायला अगदी सोपी आहे व ती बनवताना गाईचे दुध थोडे आटवून साखर, मँगो पल्प, मिल्क पावडर व कॉर्न फ्लोअर वापरले आहे.
दुध आटवून घेण्यासाठी वेळ: १५ मिनिट
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी वेळ: २ ते २:३० तास
वाढणी:४ जणासाठी
साहित्य:
१/२ लिटर गाईचे दुध
१/२ वाटी साखर
१ कप मँगो पल्प
२ टे स्पून मिल्क पावडर
१ टे स्पून कॉर्न फ्लोअर
१ टी स्पून वेलचीपूड
कृती: गाईचे दुध प्रथम १०-१५ मिनिट आतून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून विरघळवून घ्या. एका बाऊलमध्ये कॉर्न फ्लोअर घेवून त्यामध्ये थोडेसे दुध घालून मिक्स करून घेऊन मग आटवलेल्या दुधामध्ये घालून १-२ मिनिट गरम करून घ्या व बाजूला थंड करायला ठेवा.
एका भांड्यात आटवलेले दुध, मँगो पल्प, मिल्क पावडर, वेलचीपूड मिक्स करून ब्लेंड करून घ्या किंवा जुसरमध्ये ब्लेंड करून घ्या.
कुल्फीचे मोल्ड घेवून त्यामध्ये मिश्रण घालून त्यामध्ये एक एक स्टिक घाला मग डीप फ्रीजमध्ये २-३ तास कुल्फी सेट करायला ठेवा.
दुध मँगो कुल्फी सेट झाल्यावर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Mango Milk Kulfi recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=PginvodE8O8