कोकणी पद्धतीची आळूच्या पानांची पातळ भाजी: महाराष्ट्रातील कोकण ह्या भागातील ही पारंपारिक लोकप्रिय भाजी आहे. महाराष्टात लग्नाच्या जेवणात किंवा सणावाराला अश्या प्रकारची भाजी हमखास बनवतात. अळूची भाजी छान आंबटगोड लागते ती चपाती, भात किंवा पुरी बरोबर मस्त टेस्टी लागते.
आळूची पाने ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. अळूमध्ये व्हिटॅमिन “सी” व “ए” असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढते. रक्त कमी असेल तर अळूच्या सेवानाने त्याची कमतरता भरून येते. कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे हाडांचे आरोग्य ऊत्तम रहाते.
आळूचे फतफते बनवतांना शेंगदाणे, चणाडाळ, काजू, मुळा चिंचगुळ घातले आहे त्यामुळे ह्या भाजीचे चव आंबटगोड अशी अप्रतीम लागते. ही भाजी नुसती खायला सुद्धा छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४ मध्यम आकाराची आळूची ताजी पाने
१ टे स्पून प्रत्येकी शेगदाणे, चणाडाळ, ओल्या नारळाचे तुकडे पाण्यात २-३ तास भिजत ठेवा)
२ टे स्पून बेसन (पाणी घालून पेस्ट बनवा)
२ टे स्पून चिंचेचा कोळ
४ टे स्पून गुळ
१ टी स्पून लाल मिरची पावडर
२ हिरव्या मिरच्या चिरून
१ टी स्पून धने जिरे पावडर
मीठ चवीने
फोडणी करीता
१ टे स्पून तेल
१/२ टी स्पून मेथ्या दाणे
१ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून हिंग
४-५ कडीपत्ता पाने
२-४ लाल सुक्या मिरच्या
कृती: प्रथम शेगदाणे व चणाडाळ २-३ तास पाण्यात भिजत ठेवा. अळूची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. अळूचे देठ सोलून बारीक चिरून घ्या. चिंचेचा कोळ काढून घ्या. बेसन मध्ये पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. सुके खोबरे-जिरे थोडे भाजून कुटून घ्या.
एका कुकरच्या भांड्यात चिरलेला आळू, भिजवलेले शेगदाणे, मुळा, चणाडाळ, काजू व हिरवी मिरची चिरून घाला व थोडे पाणी घालून २-३ शिट्या काढून घ्या. मग रवीने चांगला घोटून घ्या.
एका कढमध्ये १ टी स्पून तेल घालून शिजलेला आळू घालून एक चांगली उकळी आली की त्यामध्ये बेसन पेस्ट घालून २-३ मिनिट शिजू द्या मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, कुटलेले खोबरे-जिरे व गुल घालून चांगली उकळी येवू द्या.
फोडणी देण्यासाठी तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की त्यामध्ये मेथ्या, मोहरी, हिंग, कडीपत्ता, लाल सुकी मिरची घालून खमंग फोडणी भाजीवर घाला.
गरम गरम अळूचे फडफडे चपाती बरोबर किंवा भाता बरोबर सर्व्ह करा.
The English language version recipe of this Aloo Chi Paatal Bhaji can be seen here – Recipe for (Colocasia) Alu chi Bhaji
The Marathi laguage video of this Alu Chi Bhaji recipe can be seen here – https://www.youtube.com/watch?v=k1VuXZYICL4