रिफ्रेशिंग थंडगार खमंग काकडी सलाड: हे सलाड आपण मेन जेवणात किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो.
काकडी ही पित्त, दाह, मुतखडा ह्यावर गुणकारी आहे. तसेच ती थंड आहे त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. काकडीचे अश्या प्रकारचे सलाडचे सेवन केल्यास लघवीची जळजळ दूर होते व ती पाचक आहे.
काकडी सलाड किवा कोशिंबीर बनवतांना बारीक चिरून त्यामध्ये कोथंबीर, शेगदाणे कुट, साखर, लिंबू, मीठ व वरतून तूप, जिरे व हिंग ची फोडणी दिली की खूप चवीस्ट स्वादीस्ट लागते.
उन्हाळा आला की काकडीचे सेवन करावे कारण की जेवणात आपण चपाती, डाळ घेतो ते पचायला थोडे जड असते त्याबरोबर काकडी खाल्ली की पचन चांगले होते.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम कोवळी ताजी काकडी
१/४ कप शेगदाणे कुट
१/४ कप कोथंबीर
२ टी स्पून साखर
२ टी स्पून लिंबूरस
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१/४ कप ओले खोबरे (खोवून)
मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून साजूक तूप
२ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून हिंग
कृती:
प्रथम काकडी धुवून सोलून बारीक चिरून घ्या. कोथंबीर चिरून घ्या. शेगदाणे भाजून सोलून कुट करून घ्या. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. ओला नारळ खोवून घ्या.
एक मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये काकडी, शेगदाणे कुट, कोथंबीर, साखर, लिंबूरस, मीठ ओले खोबरे घालून मिक्स करून घ्या.
एका फोडणीच्या वाटीत तूप गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग घालून मिक्स केलेल्या मिश्रणावर घालून एक सारखे करून घ्या. मग फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
The Marathi lannguage version of this Chilled Cucumbar Salad can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=aTryLjc9x5g