होममेड चहाचा मसाला: चहाचा मसाला चहा मध्ये घालून चहा छान कडक व टेस्टी होतो. चहाचा मसाला हा चहा बनवत असतांना दोन कप चहा साठी १/४ टी स्पून टाकायचा म्हणजे चहा छान लागतो.
आपण चहाची पावडर कोणती सुद्अधा वापरू शकता फक्श्यात चहा कडक व टेस्टी बनवण्यासाठी हा मसाला वापरावा. अश्या प्रकारचा चहा थंडीत किंवा पावसाळ्यात बनवतात तसेच सर्दी किंवा खोकला झाला असल्यास घ्यावा म्हणजे घशाला छान शेक बसतो.
घरच्या घरी चहाचा मसाला बनवून आपल्याला अमृततुल्य चहा बनवता येतो.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४० ग्राम
साहित्य:
२५ ग्राम सुंठ पावडर
१ टी स्पून काळे मिरे पावडर
१ टी स्पून पांढरी मिरे पावडर
१० ग्राम हिरवे वेलदोडे
१/२ टी जायफळ (पावडर करून)
कृती: प्रथम तवा गरम करून वरील सर्व साहित्य अगदी कमी विस्तवावर गरम करून घेवून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
मग स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवावा.
The Marathi language video on the preparation of Amruttulya Chaha caan be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=R7ej6ajHH8A