टेस्टी कुरकुरीत चटम वडा: चटम वडा हा आपण मुलांना शाळेत जातांना डब्यात देवू शकतो किंवा जेवणात किंवा चहा बरोबर सर्व्ह करू शकतो.
चटम वडा बनवतांना मुगडाळ, चणाडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ व तांदूळ वापरून बनवला आहे डाळी ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत.
चटम वडा बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे. छान कुरकुरीत लागतो त्यामुळे सर्व आवडीने खातात.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१/४ कप चणाडाळ
१/४ कप उडीदडाळ
१/४ कप मुगडाळ
१/४ कप मसूरडाळ
१/४ कप तांदूळ
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या (ठेचून)
१/४ कप ओला नारळ (खोऊन)
१ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
१/४ कप कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल चटम वडा तळण्यासाठी
कृती: प्रथम सर्व डाळी धुवून २-३ तास पाण्यात भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये चटणी जार मध्ये थोडेसे पाणी, हिरवी मिरची, आले, लसून, मीठ घालून जाडसर वाटून घ्या.
एका बाऊलमध्ये वाटलेली डाळ, चिरलेला कांदा, खोवलेला नारळ व कोथंबीर घालून मिक्स करून घ्या.
कढईमधे तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर गरम गरम तेलामध्ये छोटे छोटे वडे सोडा. वडे सोडतांना विस्तव मोठा ठेवा व वड्यावर थोडे झाऱ्यानी तेल घालून नंतर विस्तव मंद करून छान गोल्डन यलो रंगावर वडे तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व वडे तळून घ्या.
गरम गरम चटम वडा टोमाटो सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करा.