सब्जी (सुरणाचे) कबाब किंवा कटलेट: सुरणाचे कबाब हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. आपण starter म्हणून किंवा नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.
सुरण हे एक कंदमूळ आहे. सर्व कंदमुळामध्ये सुरण हे एक उत्तम समजले जाते. सुरण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सुरणा मध्ये प्रोटीन, कैल्शियम, फॉसफरस, लोह तसेच विटामीन “A” असते. तसेच सुरण हे नायटा, कोड व रक्तपीत्ताच्या रुग्णांसाठी हितावह आहे. मूळ व्याधी वर हे एक उत्तम गुणकारी आहे.
सब्जी म्हणजेच आपण सुरणाचे कटलेट कसे बनवायचे ते बघू या. ह्या मध्ये बटाटा, सुरण, आले-मिरची व फुटणा डाळ वापरली आहे. अश्या प्रकारचे कटलेट छान कुरकुरीत व स्वादीस्ट लागतात.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१०० ग्राम सुरण
४ मोठ्या आकाराचे बटाटे (उकडून, सोलून)
१” आले तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या
२ टे स्पून फुटाणा डाळ (पंढरपुरी डाळ)
१ टी स्पून लिंबूरस, २ टे स्पून कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने, ३ ब्रेड स्लाईस (क्रंबस)
तेल कबाब/कटलेट तळण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे उकडून सोलून किसून घ्या. सुरण साफ करून धुवून उकडून घ्या. आले-हिरवी मिरची व फुटणा डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कोथंबीर चिरून घ्या. ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेले बटाटे, सुरण, आले-मिरची व फुटणा डाळ घाला, लिंबूरस, मीठ, कोथंबीर घालून चांगले मिक्स करून घ्या. मग त्याचे छोट छोटे चपटे गोळे बनवा व ब्रेड क्रम्स मध्ये घोळून तयार ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर सुरण कटलेट गरम तेलात सोडून त्यावर झाऱ्याने थोडे थोडे तेल घाला व दोन्ही बाजूनी छान ब्राऊन रंगावर तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व कबाब तळून घ्या.
गरमागरम सब्जी कबाब टोमाटो सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Suran Kebab Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=L3MERmZIZU0
The English langauge recipe of the same Kebab can be seen here – Maharashtrian Style Suran Potato Kebab