झटपट सोपा पॅन केक: लहान मुलांना भूक लागली की अश्या प्रकारचा पॅन केक बनवायला मस्त आहे. कारण की पौस्टिक आहे.
पॅन केक आपण वेगवगळ्या प्रकारे बनवू शकतो. हा पॅन केक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, अंडे, साखर, दुध, वनीला इसेन्स वापरले आहे. मुले अंडे खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना अंड्यातील योक आवडत नाही त्यासाठी अश्या प्रकारचा पॅन केक बनवला तर ते आवडीने खातात.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ७-८ बनतात
साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून मैदा
२ लहान अंडी (फेटून)
१/४ कप साखर
१ कप दुध
मीठ चवीने
४-५ थेंब वनीला इसेन्स
१ टी स्पून बेकिंग पावडर
पाणी लागेल तसे पीठ भिजवण्यासाठी
तेल किंवा वनस्पती तूप किंवा बटर फ्राय करण्यसाठी
कृती: प्रथम एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये अंडे चांगले फेटून घ्या. मग फेटलेल्या अंड्यात गव्हाचे पीठ, मैदा, साखर, दुध, मीठ व लागेल तसे पाणी वापरून डोशाच्या पीठा प्रमाणे पीठ भिजवून घ्या.
मग भिजवलेल्या पीठामध्ये वनीला इसेन्स व बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करून मिश्रण १० मिनिट झाकून बाजूला ठेवा.
नॉन स्टिक पॅन चांगला गरम करून घ्या मग त्यावर तूप लाऊन छोटे छोटे पॅन केक घालून बाजूनी परत थोडे तूप सोडून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या.
गरम गरम पॅन केक सर्व्ह करा.