बेसन का चीला बेसनाचे धिरडे रेसिपी: बेसनचा चीला किंवा बेसनचे धिरडे ही डीश आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर सुद्धा बनवू शकतो. तसेच मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. बेसन चिला बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. मुलांना कधी भूक लागली तर पटकन बनवून देता येतो.
बेसनाचे धिरडे बनवतांना बेसन, कांदा, कोथंबीर, टोमाटो, लाल मिरची पावडर, हळद, हिंग व मीठ वापरले आहे. बेसन चिला सर्व्ह करतांना टोमाटो सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करता येतो.
बेसनचा चीला किंवा बेसनचे धिरडे ह्याला आपण एगलेस ऑम्लेट किंवा व्हेज ऑम्लेट सुद्धा म्हणू शकतो. बेसनचे धिरडे मुले अगदी आवडीने खातात.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ बनतात
साहित्य:
२ कप बेसन
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ मध्यम आकाराचा टोमाटो (चिरून)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने
तेल बेसनचा चीला भाजण्यासाठी
कृती: प्रथम कांदा, टोमाटो, कोथंबीर बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात बेसन, चिरलेला कांदा, कोथंबीर, टोमाटो हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ व पाणी घालून चांगले मिक्स करून आपण डोश्याचे पीठ जसे भिजवतो तसे भिजवावे व १०-१५ मिनिट तसेच झाकून ठेवावे.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर तेल लावावे व भिजवलेले मिश्रण दोन डाव घालून एक सारखे पसरवून बाजूनी थोडे तेल सोडावे मग दोनी बाजूनी छान खरपूस भाजून घ्यावे.
गरम गरम बेसन का चीला बेसनाचे धिरडे टोमाटो सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावे.
The English language version of this Besan Chil Poli Recipe can be seen here – Spicy Besan Ka Chilla
The Marathi language video of this Besnache Dhirde recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=ZdBXnYHkvXE