उडपी स्टाईल हेल्दी मसाला इडली रेसिपी: इडली म्हंटले की आपल्या डोळ्या समोर उडपी रेस्टॉरंट येते. पूर्वीच्या काळी हे पदार्थ साउथ इंडीयन लोकच बनवत होते किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळत होते पण कालांतराने हे पदार्थ आता भारत भर लोकप्रिय झाले आहेत.
आपण नेहमी इडली सांबर किंवा चटणी बनवतो. ह्या वेळेस आपण एक नवीन प्रकार बघूया. मसाला इडली ही एक छान हेल्दी डिश आहे. मसाला इडली आपण नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला मस्त आहे. किंवा घरी मुलांची पार्टी असेल तर त्यासाठी ही डीश बनवायला छान आहे. मसाला इडली बरोबर सांबर किंवा चटणी नाही बनवली तरी चालते. मसाला इडली टेबलवर आकर्षक दिसते व टेस्टी पण लागते.
मसाला इडली बनवतांना इडलीचे पीठ तयार करून घेतले व त्यामध्ये गाजर, बीन्स, आले-हिरवी मिरची, कोथंबीर, चणाडाळ, उडीदडाळ भिजवून, व फोडणी बनवून थंड करून घातली आहे. त्यामुळे ह्या बरोबर चटणी किंवा सांबर नसले तरी चालते.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य: इडली पीठ बनवण्यासाठी
२ वाट्या साधा तांदूळ
१ वाटी उडीदडाळ
२ टे स्पून इडली रवा
(प्रथम ७-८ तास डाळ व तांदूळ भिजत घालून वाटून परत ७-८ तास झाकून ठेवा.)
मसाला इडली बनवण्यासाठी:
२ टे स्पून चणाडाळ (भिजवून)
१ टे स्पून उडीदडाळ (भिजवून)
१/४ कप गाजर व बीन्स (चिरून)
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
३-४ हिरव्या मिरच्या (चिरून)
१” आले (चिरून)
मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१०-१२ कडीपत्ता पाने (चिरून)
कृती: प्रथम डाळ व तांदूळ धुवून ७-८ तास भिजत ठेवा मग बारीक वाटून त्यामध्ये इडली रवा घालून परत झाकून ७-८ तास बाजूला ठेवा म्हणजे पीठ चांगले फुलून येईल.
चणाडाळ व उडीदडाळ भिजत घाला. गाजर, बीन्स व कोथंबीर चिरून घ्या. आले-हिरवी मिरची चिरून घ्या. कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता घालून फोडणी बनवून थंड करायला ठेवा.
जेव्हा इडली बनवायची तेव्हा इडलीच्या पिठात फोडणी, गाजर, बीन्स, कोथंबीर, हिरवी मिरची, आले, भिजवलेली डाळ, मीठ घालून मिश्रण एक सारखे करून घ्या.
इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये एक एक डाव इडलीचे मिश्रण घालून १२-१५ मिनिट इडली वाफवून घ्या.
गरम गरम मसाला इडली सर्व्ह करा.
The video in Marathi of this South Indian Masala Idli Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=lFOpvL16gtU
The English language version of this Idli Recipe can be seen here – South Indian Masala Idli