कुरकुरीत हेल्दी ओट्स व पोहे चिवडा दिवाळी फराळ रेसिपी: ओट्स खाण्याने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. ओट्सचे रोज नियमित सेवन केले तर वाईट bad कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहते. हार्ट संबंधीत तक्रारी कमी होतात. तसेच त्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे. आपल्या शरीराचे वजन कमी होते. कॅन्सर होत नाही व डायबेटीस ज्यांना आहे त्यानी रोज ओट्स सेवन करावे त्यामुळे शुगर लेव्हल बरोबर राहते.
ओट्स व पोहे चिवडा बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. दुपारी चहा बरोबर सर्व्ह करायला किंवा मुलांना शाळेत छोट्या सुट्टीत खायला छान हेल्दी आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप ओट्स
१ कप पोहे
१/४ कप शेगदाणे
१/४ कप पंढरपुरी डाळ
१/२ कप खाकरा (तुकडे करून)
मीठ व पिठीसाखर चवीने
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून हिंग
१/२ टी स्पून हळद
४ हिरव्या मिरच्या (चिरून)
१०-१५ कडीपत्ता पाने
कृती: एका मध्यम आकाराच्या कढईमध्ये ओट्स मंद विस्तवावर ४-५ मिनिट भाजून घ्या, मग पोहे मंद विस्तवावर ४-५ मिनिट भाजून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता पाने घालून शेंगदाणे घालून परतून घ्या मग पंढरपुरी डाळ, हळद, खाकरा तुकडे, घालून ओट्स व पोहे घालून मिक्स करून घेऊन पिठीसाखर व मीठ चवीने घालून चिवडा २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. चिवडा थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
The Marathi language video of this Chiwda Recipe can be seen on our YouTube Channel – Oats and Poha Chivda for Diwali Faral