महाराष्ट्रीयन पद्धतीने पारंपारिक दिवाळी फराळ खमंग चकली भाजणी पीठ कसे बनवायचे रेसिपी
दिवाळी हा सण महाराष्टात खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. दिवाळी आली की आपण नाना प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवतो. फराळ म्हंटले की खमंग कुरकुरीत चकली हवीच. छान कुरकुरीत स्वादीस्ट चकली बनवण्यासाठी चकली भाजणी पीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत.
खमंग कुरकुरीत चकलीची भजनी पीठ आपण घरी बनवू शकतो. चकली भाजणी बनवतांना तांदूळ, चणाडाळ, उडीदडाळ वापरली आहे.
चकली भाजणी बनवण्यासाठी प्रथम तांदूळ, चणाडाळ व उडीदडाळ धुवून सावलीत वाळवून मग चांगली मंद विस्तवावर भाजुन मग बारीक दळून आणावे म्हणजे चकली छान खमंग बनते.
The Marathi language video of the same Bhajani Recipe can be seen on our YouTube Channel – Khamang Maharashtrian Chakli Bhajani for Diwali Faral
The Marathi Language Video How to make Chakli can be seen here: Tasty Crispy Maharashtrian Style Chakli
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३ ½ किलो ग्राम बनते
साहित्य:
२ किलो जाड तांदूळ
१ किलो चणाडाळ
१/२ किलो उडीदडाळ
१०० ग्राम धने
५० ग्राम जिरे
कृती: प्रथम तांदूळ निवडून स्वच्छ धवून कापडावर पसरवून घ्या. मग उडीदडाळ व चणाडाळ धवून कापडावर पसरून घ्या. मग घरात सावलीत २४ तास वाळत ठेवा.
एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवा मग त्यामध्ये तांदूळ मंद विस्तवावर भाजून घ्या. त्यानंतर चणाडाळ व उडीदडाळ मंद विस्तवावर भाजून घ्या. तांदूळ व डाळी भाजताना जळता कामा नये.
तांदूळ व डाळी भाजून झाल्यावर धने व जिरे भाजून घ्या मग सर्व थंड झाल्यावर गिरणी मधून बारीक दळून आणा.
चकलीची भाजणी दळून आणल्यावर हवा मंद डब्यात भरून ठेवा. मग लागेल तसी काढून घेवून चकली बनवा.
The text of How to make Chakli Bhajni In English Language can be seen here: How To Make Chakli Bhajni
भाजणी बनवतांना महत्वाच्या टिप्स
१) चकलीची भाजणी बनवतांना धान्ये धुऊन सावलीत वाळवून घ्या.
२) धान्ये वाळल्यावर मंद विस्तवावर भाजून घ्या.
३) धान्ये भाजताना करपता कामा नये.
४) भाजणी दळताना बारीक दळून आणावी.
५) भाजणीचे दळलेले पीठ घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा मग जास्त दिवस टिकेल.
६) तांदूळ जाड वापरावा म्हणजे भाजणी भिजवल्यावर छान फुलते. सुवासिक किंवा आंबेमोहर वापरू नये.