डाळ दुधी भोपळा भाजी मुलांना ड्ब्यासाठी रेसिपी
दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी हितावह आहे. दुधी भोपळ्यामध्ये मातेच्या दुधासारखे घटक आहेत. दुधी भोपळा ही अशी भाजी आहे की त्यापासून आपण चटणी, हलवा भाजी बनवू शकतो. त्याचा बीयांचा पण औषधा साठी उपयोग केला जातो. जे अशक्त लोक आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्याच्या साठी दुधी खूप उपयोगी आहे.
दुधी हृदयास हितकारी, पिक्त व कफनाशक, जड, रुची उत्पन्न करणारा आहे. दुधी गर्भाचे पोषण करणारा आहे. तसेच गर्भावस्थेतील मलबद्धता दूर होते. क्षयरोग्यासाठी दुधी अत्यंत हितावह आहे.
दुधीची चणाडाळ घालून केलेली भाजी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधीची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
२५० ग्राम दुधी भोपळा
१ टे स्पून चणाडाळ
३-४ हिरव्या मिरच्या
१ टि स्पून धने-जीरे पावडर
गूळ व मीठ चवीने
१ टे स्पून कोथबीर (चिरून)
१ टे स्पून ओला नारळ (खोवून)
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१/२ टि स्पून मोहरी
१/२ टि स्पून जिरे
१/४ टि स्पून हिंग
१/४ टि स्पून हळद
![Maharashtrian Style Dal Dudhi Bhoplyachi Bhaji](https://www.royalchef.info/wp-content/uploads/2019/10/Maharashtrian-Style-Dudhi-Bhoplyachi-Bhaji-300x202.png)
कृती:
प्रथम दुधी भोपळा धुवून त्याची साले काढून घ्या. मग त्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून पाण्यानी धुवून घ्या. चणाडाळ १ तास पाण्यात भिजत ठेवा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून चिरलेली हिरवी मिरची, भिजवलेली चणाडाळ घालून हळद घाला व नंतर चिरलेला दुधी भोपळा घालून मीठ घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवा व झाकणात पाणी घालून मंद विस्तवावर भाजी १०-१५ मिनीट शिजू द्या. अधून मधून भाजी हलवत रहा.
कढई वरील झाकण काढून भाजी मध्ये धने-जीरे पावडर, गूळ, कोथबीर, ओला नारळ घालून मिक्स करून मंद विस्तवावर ४-५ मिनिट भाजी थोडी कोरडी होई परंत शिजवून घ्या.
गरम गरम डाळ दुधी भोपळा भाजी चपाती बरोबर किवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the same Maharashtrian Bhaji can be seen here – Maharashtrian Recipe for Dudhi Bhoplyachi Bhaji