सोपे घरगुती उपाय भांडी व घरगुती वस्तू साफ कश्या करायच्या नुस्के किंवा टिप्स
दिवाळी दिपावली जवळ आलीकी आपण घराची साफसफाई चालू करतो किंवा काही सणवार असेलतरी आपण आपले घर अगदी लक्ख करतो. त्यामध्ये आपली चांदीची भांडी, स्वयंपाक घरातील भांडी, फ्रीज साफ करणे त्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्या आपल्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठी उपयोगी आहेत.
आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की काही सोपे घरगुती वस्तू कश्या स्वच्छ करायच्या. आपण फ्रीज जास्त प्रमाण वापरतो व आजकाल प्रत्येक घरात असतो. खूप वेळा .
तसेच आपण किचनमध्ये नेहमी काम करत असतो त्यामुळे आपली रोज वापरायची भांडी, कटलरी कशी स्वच्छ ठेवायची. त्यामध्ये आपला सर्वात जास्त प्रश्न म्हणजे कढया त्या नेहमी वापरून काळ्या होतात त्या कश्या स्वच्छ करायच्या ते आपण ह्या विडीओ मध्ये बघणार आहोत.
आपण घरगुती वस्तू साफ करण्यासाठी बाजारातून महागडे साबण किंवा काही केमिकल्स आणतो त्यपेक्षा आपण स्वस्त व मस्त घरगुती उपाय वापरले तर किती मस्त होईल.
एक लहान कापसाच्या बोळ्यावर वनीला इसेन्सचे २-३ थेंब टाकून फ्रीजमध्ये ठेवा इतर खराब वास येणार नाही.
चांदीच्या भांद्यावरील नक्षीकाम स्वच्छ करण्यासाठी जुना टूथब्रश वापरा. तसेच चांदीची भांडी व्हीम पावडरने पुसून काढल्यावर स्वच्छ होतात.
आपण पदार्थामध्ये रंग किंवा इसेन्स वापरतो तेव्हा ड्रॉपपर वापरा म्हणजे नासाडी होणार नाही.
गंज चढलेली सुरी साफ करण्यासाठी तिचे पाते कांद्यामध्ये खुपसून ठेवावे.
लोखंडी तवा, कढई, खलबत्ता, धुतल्यावर पुसून ठेवावा म्हणजे गंज चढत नाही.
खूप वेळा आपल्या पोळपाटाला भेगा असतात. त्यात पिठी अडकून रहाते तेव्हा हातात थोडे साधे वरण घेवून ते पोळपाटावर चोळलयास पोळपाट स्वच्छ होतो.
स्टीलची भांडी राखेने घासल्याने ती खराब दिसतात व त्याची चकाकी कमी होते. त्यासाठी आपण चहा बनवतो तेव्हा चहा गाळल्यावर चोथा टाकून न देता तो वाळवून त्यानी भांडी घासावी मग चकाकी चांगली येते.
जळक्या भांड्याला मीठ लावले असता ते लवकर साफ होते.
The video in Marathi of these easy home remedies or tips can be seen on our YouTube Channel – Home Remedies in Marathi for Cleaning Kitchen Utensils and Silver