सर्वान साठी सहज करण्यात येणारे सोपे वास्तूशास्त्र उपाय
स्वतःचे घर हे प्रतेकाचे एक स्वप्न असते. जेव्हा घर घ्यायचे तेव्हा आपल्या मनात नानाविध प्रश्न असतात. त्याच बरोबर घर घेतल्यावर त्याची पूजा कधी करायची किंवा गृह प्रवेश कधी करायचा ते आपण ठरवत असतो. तसेच घर घातल्यावर राहायला गेल्यावर सुधा आपण विचार करत असतो की आपले घर आपल्याला चांगले लाभावे त्यामध्ये सुख शांती रहावी.
आपल्या घरात सुख शांती रहावी म्हणून काही सोपे छोटे छोटे उपाय जे समजले ते इथे शेअर करीत आहे. जेणेकरून आपले जीवन सुरळीतपणे चालावे. आजकाल आधुनिक युगामध्ये लोक अंधश्रद्धा म्हणतील पण आपण ह्यावर विश्वास ठेवून असे सोपे उपाय करून बघावे त्यानी आपल्याला फायदाच होईल काही नुकसान होणार नाही.
वस्तू संबधी उपाय हे आपण सोपे आहेत ते आपण अगदी सहजपणे करू शकतो.
आपल्या घरासाठी व सुखासाठी काही सोपे उपाय जे आपण सहज करू शकतो.
आपल्याला जर काही सोपे उपाय माहीत असतील तर ते जरूर शेअर करावे जेणेकरून त्याचा दुसऱ्याला सुद्धा फायदा होईल.
वास्तू म्हणजेच आपले स्वतःचे हक्काचे घर जे आपण आपली आयुष्याची पुंजी लाऊन घेतो. तेव्हा आपण सगळ्या बाजूनी विचार करून मग घेतो. त्यासाठी काही माहिती थोडीफार देत आहे.
आपण सर्व बाजूनी विचार करून जेव्हा घर घेतो तेव्हा महत्वाचा भाग म्हणजे वास्तुशांती.. आपल्याकडे असे म्हणतात की साडेतीन मुहूर्तावर वास्तुशांती करू नये फक्त गृह प्रवेश करावा.
आपल्या घरामध्ये कासव, मुंगुस, ससा ह्याची प्रतिमा बाळगल्यास घरात सुखाचे वास्तव्य होते.
घराचा मुख्य दरवाजा नेहमी ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा कारण मुख्य दरवाजातून लक्ष्मी प्रवेश करते. संध्याकाळी मुख्य दरवाजा थोडावेळ उघडा ठेवा कारण त्यावेळी लक्ष्मी घरात प्रवेश करते. आपल्या घराच्या दरवाजावर कधी पाय मारू नये.
आजकाल नवीन घरामध्ये मुख्य दरवाजाला उंबरठा नसतो. तर उंबरठा जरून लावावा त्यामुळे अनेक पीडा घराबाहेर राहतील. उंबरठा म्हणजे मर्यादाचे प्रतीक आहे. घराला नेहमी लाकडी उंबरठा बसवावा.
आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जवळ किंवा वर तुटक्या, मुटक्या, फुटक्या वस्तू ठेवू नयेत. दरवाजावर नेहमी “OM” “ॐ” कींवा स्वस्तिक अथवा त्रिशूलचे चिन्ह लावावे शुभ असते.
घरामध्ये किंवा घरासमोरील बागेत काटेरी झाडे (cactus) लाऊ नयेत त्यामुळे घरात शांतता रहात नाही.
घराच्या आवारात आपण तुळशीचे रोप लावतो तसेच शमीचे सुद्धा रोप लावावे शुभ मानले जाते.
घरामध्ये मोडलेली खुर्ची, बंद घड्याळ कधी ठेवू नये. घरामध्ये फुटकी तडा गेलेली भांडी ठेऊ नयेत. घरातील झाडू, खराटा, व्ह्क्युम क्लिनर बाहेरील माणसाच्या नजरेत येणार नाही असे ठेवावे.