टेस्टी थाई चकली: दिवाळी फराळ म्हंटले की चकली ही आलीच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण कसा होणार. ह्या आगोदर आपण खमंग भाजणीची चकली पाहिली तसेच अजून वेगवगळ्या प्रकारच्या चकल्या सुद्धा पाहिल्या. बटर चकली, मसाला चकली, मुरक्कू, शेजवान, बेसन, ज्वारीच्या पीठाची, पालक चकली, मुगाच्या डाळीची चकली आपल्याला नेहमी पदार्थ बनवतांना काहीतरी वेगळे करावेसे वाटते. म्हणजेच फ्युजन. महाराष्ट्रातील महिलांची चकली ही एक पारंपारिक व लोकप्रिय डीश आहे त्यांचा त्यामध्ये कोणी हात धरू शकत नाही. पण आता प्रतेक प्रांतात चकली हा पदार्थ बनवला जातो व त्या प्रांतानुसार त्याची पद्धत, साहित्य व कृती बदलत जाते.
थाई चकली हा पण चकलीचा एक निराळा प्रकार आहे. ह्या मध्ये धन्य न धुता कोरडेच खमंग भाजून घेवून दळून त्यामध्ये थाई रेड करी पेस्ट व थाई रेड चिली सॉस वापरला आहे. त्यामुळे त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. थाई चकली आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर वेळी नाश्त्याला किंवा चहा बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: ७० मिनिट
वाढणी: ४० चकल्या बनवतात
साहित्य:
१ १/२ कप तांदूळ
१/२ कप चणाडाळ
१/४ कप उडीदडाळ
१/४ कप पोहे
तळण्यासाठी तेल
मसाला करीता:
१/२ थाई रेड करी पेस्ट
२टे स्पून रेड चिली सॉस
२ टे स्पून तेल
१/४ कप तीळ
मीठ चवीने
कृती: प्रथम तांदूळ, चणाडाळ, उडीदडाळ व पोहे निवडून घ्या पण धुवायचे नाही. मग एका कढईमधे तांदूळ, चणाडाळ, उडीदडाळ व पोहे वेगवेगळे मंद विस्तवावर खमंग भाजून घेवून थंड झाल्यावर गिरणी मधून दळून आणा.
आपण जेव्हडे भाजणीचे पीठ घेणार तेव्हडेच पाणी एका भांड्यात घ्या. समजा आपण दोन कप पीठ घेतलेतर दोन कप पाणी घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा व पाणी उकळले की त्यामध्ये रेड करी पेस्ट, चिली सॉस, मीठ व तेल घालून मिक्स करून पीठ घालून मिक्स करून एक मिनिट मंद विस्तवावर झाकून ठेवा. मग विस्तव बंद करून पीठ थोडावेळ तसेच ठेवा. नंतर पीठ एका परातीत काढून तीळ घालून चांगले मळून घ्या. पीठ मऊ झालेकी एका कापडात गुंडाळून १०-१५ मिनिट बाजूला ठेवा.
एका प्लास्टिकचा पेपर घ्या. चकली सोरयामध्ये थोडे थोडे पीठ घालून प्लास्टिकच्या पेपरवर चकल्या काढून घ्या. एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चकल्या छान कुरकुरीत गोल्डन रंगावर तळून घ्या.
थाई चकली थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
The Marathi language video of the same Chakli Recipe can be seen on our YouTube Channel – Crispy Thai Masala Chakli Video in Marathi