घरात सुख समृद्धी व लक्ष्मी राहण्यासाठी १३ सोपे टोटके टीप्स अथवा उपाय भाग २
घरात सुख समृद्धी, शांती व आर्थिक चणचण होऊ नये म्हणून प्रतेक जाण झटत असतो. ह्या विडियो मध्ये आशेच काही सोपे साधे सरळ छोटे छोटे उपाय टोटके आहेत जे प्रतेक जण अगदी सहज पणे करू शकतो.
उपाय अगदी सोपे आहेत त्यासाठी काही फार कष्ट घ्यायची गरज नाही तेसेच आपण हे उपाय कधी सुद्धा करू शकतो. फक्त हे उपाय करताना आपण पूर्ण आत्मविश्वास व अगदी मांनापासून करायचे म्हणजे आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल.
जर आपण यात्रेला चालला असाल तर आपल्या पूर्वजांचे फोटो बघून मग यात्रेला निघावे.
‘प्रबिशि नगर कीजे सब काजा, हृदय राखि कौशलपुर राजा।’ हा मंत्र म्हणून घरातून बाहेर पडा प्रभू प्रवासात तुमचे सदैव रक्षण करील.
नोकरी, व्यवसाय किवा शुभकार्य साठी निघण्यापूर्वी घरातील कोणत्यापण व्यक्तीला एक मूठभर काळे उडीद ओवाळून जमिनीवर टाकायला सांगा काम पूर्ण होईल.
घरी येताना रीकाम्या हातांनी येवू नये काहीना काही जरूर आणावे असा नीयमच करा.
रविवारीच्या दिवशी सहदेवीच्या झाडाचे मूळ घरी आणून एका लाल कापडात गुंडाळून पवित्र स्थानी ठेवा. काळी हळद जर मिळाली तर घरी आणून ठेवा.
पांढरी रेती, दक्षिणवर्ती शंख, हात जोडी, एक मुखी रुद्राक्ष, गोरोचन, नागकेसर, सापाची अखंड कात, मोरचे पंख व अष्टगंध ह्या वस्तु लक्ष्मी मातेला आवडतात व ह्या वस्तु घरात ठेवल्यातर लक्ष्मी प्रसन्न होते.
प्रतेक शनिवारी व आमवासच्या दिवशी दरवाजावर लिंबू मिरची बांधावी त्यामुळे आपल्या घराला वाईट नजर लागत नाही.
पुष्य नक्षत्र ह्या दिवशी बहेड़ा वृक्षचे मूळ किवा एक पान घरी आणून ज्या ठीकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठीकाणी ठेवा.
मुलांना घराच्या भिंतीवर किवा जमिनीवर पेन्सिल, खडू किवा कोळसा ह्यांनी रेगोट्या मारू देवू नका कारण त्यामुळे कर्जाचा बोजा वाढतो.
पुष्य नक्षत्रच्या दिवशी वडाचे किवा पिंपळाचे ताजे पान तोडून त्यावर हळदीने स्वस्तीक काढून घरात ठेवा.
व्यापारा संबंधीत पत्रव्यवहार करतांना त्यावर हळद किवा केसर शिंपडून मग पाठवा. अश्या पत्रावर देवाचे फूल दाखवून पाठवा.
बँकमध्ये पैसे जमा करताना लक्ष्मी मंत्र म्हणून मग जमा करा. बँक पासबुक, चेक बुक श्री यंत्र किवा कुबेर यंत्रच्या जवळ ठेवा.
आपले ऑफीस, दुकान उघडल्यावर प्रथम आपल्या इष्टदेवाचे स्मरण करावे.
ज्या घरात विष्णु सहस्त्रनामचे रोज वाचन होते तेथे लक्ष्मी निवास करते.
‘राम रक्षा स्तोत्र’ नियमीत म्हणावे लक्ष्मी लाभ होतो. लक्ष्मी माताला कमळाचे फूल प्रिय आहे. तसेच लक्ष्मी मातेला तुळशी किवा तुळशी माळ कधी घालायची नाही.
पुजा करताना पूर्व किवा पश्चिम दिशेला बसून पुजा करावी.
घरच्या प्रवेश दारावर गणेशजीचा फोटो अश्या प्रकारे लावाकी त्यांचे तोंड घरच्या आतील बाजूस असेल. घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवा.
हीरा रत्न जर धारजीण झालेतर वैभव मिळते. घरात जर तुळस लावली असेलतर रोज संध्याकाळी तुळसी जवळ दिवा लावावा. शंखपुष्पीचे झाड घरात लावणे चांगले असते.
The video in the Marathi of the same Totke for Money and Abundance can be seen on our YouTube Channel-Simple and Easy Totke in Marathi for Wealth, Money and Prosperity