घरात सुख समृद्धी व लक्ष्मी राहण्यासाठी 15 काही सोप्या टोटके टीप्स अथवा उपाय भाग १
घरात सुख समृद्धी व आर्थिक चणचण होऊ नये म्हणून प्रतेक जाणला वाटत असते व प्रतेक जण त्यासाठी झटत असतो. ह्या विडियो मध्ये आशेच काही सोपे साधे सरळ छोटे छोटे उपाय आहेत जे प्रतेक जण अगदी सहज पणे करू शकतो. ह्या तील आपल्याला बरेच उपाय कदाचीत माहीत सुद्धा असतील पण काही कारणामुळे आपल्याला विसर पडतो.
उपाय अगदी सोपे आहेत त्यासाठी काही फार परीश्रम नाही तेसेच आपण कधी सुद्धा करू शकतो. फक्त हे उपाय करताना आपण आत्मविश्वास श्रद्धेनी व अगदी मांनापासून करायचे म्हणजे आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल.
आपण सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या तळ हाताना काही क्षण बघून त्यांचे चुंबन घेवून मग ते एकमेकावर रगडून मग आपल्या चहर्यावर तीन वेळा फिरवावे.
आपल्या नाकपुडीतून एकाग्र मनाने आपल्या कोणत्या नाकपुडीतून स्वर येतो ते पाहून प्रथम त्या बाजूचा हात जमीनीला लावून तो हात आपल्या डोक्यावरून फिरवा. मग त्या बाजूचा पाय खाली टेकवून उठा.
घरी जेवण बनवताना त्यातील एक चपाती रोटी गाय साठी बाजूला काढून ठेवा. आपल्या घरी बनवलेल्या जेवणातून थोडेसे जेवण कावळ्यासाठी किंवा पक्षासाठी काढून ठेवा.
रात्रीच्या जेवणातील काही भाग डॉग साठी काढून ठेवा. जेवण कधी सुद्धा नालीमध्ये टाकू नका उरलेटीतर पशू पक्षांना द्या.
आपण गहू दळून आणतो तर शक्यतो शनिवारी ह्या दिवशी दळून आणावा. गव्हाचे दळण करताना त्यात 100 ग्राम काळे चणे घाला. शनिवारच्या जेवणात काळे चणे आवश्य सेवन करा.
जेव्हा काळ्या मुंग्या दिसतील तेव्हा त्यांना साखर व गव्हाचे पीठ मिक्स करून खायला द्या.
आपल्या घरात देवी देवतांचे फोटो भिंतीवर टांगले असतील तर त्यांना अष्टगंध व अक्षता लावाव्या. आपल्या पूर्वजाचे फोटो लावले असतील तर त्यावर फुलांचा हार लावावा.
संध्याकाळच्या आत घरात झाडू मारून मगच काही खावे. आपल्या घरात संध्याकळी लक्ष्मीचे आगमन होते तेव्हा घरात झाडू पोछा करू नये. किवा संध्याकाळी लक्ष्मी येते तेव्हा झोपू नये.
संध्याकाळ होण्याच्या आत घरात दिवे लावावे व देवा समोर दिवा अगरबत्ती लावावी. घरातील सौभाग्यवतीने तयार हौऊन प्रफुल्ल मनाने देवा समोर दिवा आगरबती लावावी.
घरातून सकाळी घरा बाहेर पडण्या आगोदर प्रथम घरात झाडू मारावा मगच घरा बाहेर पडावे. घरातून बाहेर पडतांना काहीतरी खावून मगच बाहेर पडावे उपाशी पोटी बाहेर पडू नये. जर गोड काही खावून बाहेर पडले तर उत्तमच आहे.
घरातील कोणी व्यक्ती घरा बाहेर जाणार असेल तर घरातील स्त्रीने त्यांना दरवाजा परंत सोडवायला जावे. घरातील व्यक्ती घराबाहेर कामा साठी निघतांना मागून आवाज देवू नये. घरातून बाहेर पडताना जाते किवा जातो न म्हणता येते किवा येतो असे म्हणावे.
कोणत्यापण सुवासीनीला दर गुरुवारी श्रृंगाराची वस्तु भेट म्हणून दिली तर लक्ष्मी प्रसन्न होते.
घरातील किंवा बाहेरील स्त्री विषयी आदर भाव ठेवावा तसेच 10 वर्षाच्या आतील कुमारीकाला देवीच्या रूपात प्रसन्न केले तर आपल्या सुख-समृद्धि प्राप्त होते.
कोणी दरिद्री किवा असहाय व्यक्तीला निस्वार्थीपणे मदत करावी त्याचा तिरस्कार किंवा उप हास करू नये. थंडीच्या दिवसात अमावस्याच्या मध्यरात्री थंडीनी कुडकुडणार्या भीकारीच्या अंगावर कंबळ टाका व चुपचाप घरी निघून या.
दरिद्री माणसाला भरपेट जेवण व कपडा दान करा. घरातील पुजा घरात शेंडी असलेला नारळ ठेवावा.
पैशाच्या संबंधीत कार्यासाठी घराबाहेर पडताना घरातील देवी देवतांचे फोटो मूर्तीचे किवा यंत्राचे दर्शन घ्या व त्यावरील फूल आपल्या खिशात ठेवावे.
The video in the Marathi language can also be seen on our YouTube Channel-Simple and Easy Totke for Money and Abundance in Marathi