मेंदूची क्षमता प्रचंड व तीव्र करण्यासाठी चमत्कारी क्रीं बीज / Kreem Beej Mantra मंत्र
प्रभावी व महाशक्तिशाली बीज मंत्र क्रीं क्रीं क्रीं / Kreem Kreem Kreem त्याचे उच्चारण करा व पहा चमत्कार मेंदूची क्षमता बुद्धती तीव्र होते स्मरणशक्ती वाढते परीक्षेत मार्क्स चांगले मिळतात काम धंदा नोकरी ह्यात प्रगती होते सामाजिक व घरेलू जीवनात सुख समाधान व आनंद मिळतो.
लहान मुले म्हणजे वयोगट 5-7, 7-12, 13-१५ ह्या वयोगटातील मुले शाळेत जायचा कंटाळा करतात किवा त्यांना अभ्यास करायचा कंटाळा करतात किवा ते अभ्यास न करण्याची कारणे शोधत असतात. शाळेत जायची वेळ आली की किंवा होमवर्क गृहपाठ करायची वेळ आली की त्यांचे पोट दुखते किवा अजून काही दुखते किंवा झोप येते अशी कारणे सांगत असतात. कारण की त्यांना अभ्यास करायचा कंटाळा येतो. त्यामुळे मुलांचे आई वडील त्यांच्या अभ्यासा वरुण चिंतीत असतात. तसेच बहुसंख्य पालक मुलांच्या अभ्यासावरून अगदी हतबल मग ते मुलांना शिकवणी म्हणजेच ट्यूशनला बळजबरीने टाकतात आजकाल शिकवणी काही स्वस्त नाही.
मुलांनी अभ्यास करावा म्हणून पालक मुलांना जे पाहीजे त्या वस्तु आणून देतात जेणे करून मुलांनी अभ्यास करावा. पण मग मुलांना सारखी काही ना काही मागायची सवय लागते. मग ते सारखी डिमांड करून लागतात. तसेच मुलांचा एक मोठा प्रश्न म्हणजे ते एका जागी बसत नाहीत.
मुलांचा एक अजून मोठा प्रश्न म्हणजे त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मन लागत नाही. अभ्यासाला बसली की सारखी उठतात तहान लागली, भूक लागली, सुसू आली ई. किवा असे सुद्धा होते की मुलांना अभ्यास करायची किवा शाळेत जायची भीती वाटते. कारण त्यांना एखादा विषय समजत नाही किवा एखादया विषयामध्ये गोडी वाटत नाही. बर्याच वेळा असे होते की मुले अभ्यास करतात पण त्यांचे रिझल्ट चांगले येत नाहीत. त्यामुळे मुले व पालक नाराज दिसतात.
आता ह्या अगोदर आपण लहान मुलांच्या अभ्यासा बद्दल पाहीले आता आपण मोठी मुले किवा मोठी माणसे ह्यांच्या बद्दल बघणार आहोत. मोठ्या मुलांच्या बाबतीत सुधा काही असेच म्हणावे लागेल की अभ्यास करताना मन एकाग्र होत नाही किवा काही चंचलपणा असतो किवा स्मरणशक्ति कमी पडते लक्ष विचलीत होते.
तसेच मोठ्या माणसान बद्दल म्हणायचे झालेतर ऑफिस कामामध्ये चुका होणे, कामात लक्ष न लागणे, कामे न आठवणे.
ह्या सर्व अडचणीवर एक सहज सोपा प्रभावी शक्तिशाली बीज मंत्र आहे. ह्या बीज मंत्राचा रोज कमीत कमी 15 मिनीट किंवा त्यापेक्षा अधिक वेळ मुलांनी व मोठ्यांनी मंत्र उच्चार करा मग बघा त्याचे प्रभावी परिणाम.
मंत्र उच्चारण करताना आपण कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा करायची गरज नाही. तसेच मंत्र उच्चारण कधी सुधा करू शकता त्यासाठी वेळेचे बंधन नाही. तसेच जागेचे बंधन नाही.
मंत्र जाप करतांना फक्त पूर्ण आत्मविशस्वाने व श्रद्धेने केले तर आपल्याला नक्कीच ह्याचा फायदा होईल व आपल्या ब्रेन म्हणजेच मेंदूचे कार्य वाढून त्याचे चांगले परीणाम दिसू लागतील. अभ्यासामधील मधील प्रगती होवून रीझल्ट चांगले येतील कामात सुद्धा खूप सुधारणा होतील.
मंत्र अश्या प्रकारे आहे
The video of this brain power increasing Mantra Chant can be seen on our YouTube Channel – Mantra to Boost Brain Power in Marathi