दिवाळी फराळ उरला चला मुलांना खाऊ साठी फराळाची चटपटीत भेळ बनवूया रेसिपी
दिवाळी फराळ शिल्लक राहीला तर त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. मुख्यता तिखट पदार्थ राहिले तर आपण अश्या प्रकारची चटपटीत भेळ बनवू शकतो. अश्या प्रकारची भेळ बनवतांना चिवडा, शेव, चकली, कडबोळी, खारे शंकरपाळे असे फरळचे पदार्थ वापरुन कांदा, बटाटा, टोमॅटो वापरला आहे व भेळ बनवतात त्यासाठी आपण गोड चटणी व हिरवी चटणी बनवतो त्याप्रमाणे चटणी बनवली आहे.
फराळाची चटपटीत भेळ ही आपण नाश्त्याला किवा दुपारी चहा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. मुलांना अश्या प्रकारची भेळ नक्की आवडेल कारण की ह्यामध्ये त्यांचे सगळे आवडतीचे पदार्थ आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनीट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 कप चिवडा (पोहयाच्या/ मुरुमुरे/ कॉर्न फ्लेक्स)
1 कप शेव (बारीक/जाड)
5-6 चकली (भाजणी/ तांदूळ), 5-6 कडबोळी
1 कप खारी शंकरपाळी
1 मोठा कांदा (बारीक चिरून)
1 मध्यम टोमॅटो (बारीक चिरून)
1 लहान बटाटा (उकडून सोलून चिरून)
1/4 कप कोथबिर (चिरून)
2 टे स्पून गोड चिंच गुळाची चटणी
2 टे स्पून हिरवी तिखट पुदिना चटणी
1 टी स्पून चाट मसाला
सजावटी साठी: कांदा, कोथबीर व टोमॅटो (बारीक चिरून)
कृती:
चिंच गुळाची गोड चटणी व पुदीन्याची चटणी बनवून घ्या. चकली व कडबोळीचे तुकडे करून घ्या. कांदा, कोथबीर व टोमॅटो बारीक चिरून घ्या. बटाटा उकडून सोलून चिरून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये चिवडा (पातळ पोहे, मुरमुरे किवा कॉर्न फ्लेक्स), शेव (जाड/ बारीक), चकली (भाजणी/तांदळाची), कडबोळी, शंकरपाळी, चिरलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथबिर घालून मिक्स करून घ्या. त्यामध्ये चाट मसाला, गोड चटणी, तिखट चटणी, अगदी थोडेसे मीठ घालून मिक्स करून घ्या.
चाटपटीत फराळी भेळ सर्व्ह करताना वरतून बारीक चीरलेला कांदा, कोथबिर, टोमॅटो व बारीक शेव घालून सजवून मग सर्व्ह करा.
The Marathi language video of the same Bhel Recipe can be seen here on our YouTube Channel – दिवाळी फराळ उरला चला मुलांना खाऊ साठी फराळाची चटपटीत भेळ बनवूया