पौस्टीक अंड्याशिवाय गव्हाच्या पिठाचा केक
गव्हाच्या पिठाचा केक बनवतांना मैदा किंवा साखर किवा अंडे वापरले नाही. तसेच बिना ओव्हनचा अश्या प्रकारचा केक बनवतना कुकर किवा कढाई किवा नॉन-स्टीक भांडे (पॅन) वापरायचा आहे.
गव्हाच्या पिठाचा केक बनवायला अगदी सोपा आहे तसेच झटपट होणारा आहे. गव्हाचे पीठ म्हणजेच आटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे ते आपल्याला माहीत आहेच. तसेच साखर वापरण्या आयवजी गूळ वापरला आहे. अंडी वापरण्याच्या आयवजी दही वापरले आहे. अश्या प्रकारचा केक आपण मुलांना डब्यात देवू शकतो किंवा नाश्त्याला किवा दुपारी टी टाईमच्या वेळी सर्व्ह करू शकतो.
आट्याचा केके बनवताना सर्व साहीत्य जे वापरले आहे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
बेकिंग वेळ: 35 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1मोठी वाटी गव्हाचे पीठ (आटा)
1 वाटी गूळ
1 वाटी दही
1/2 कप दूध
1 1/2 चमचा बेकिंग सोडा
1/2 चमचा बेकिंग पावडर
1 टे स्पून चॉकलेट सॉस
ड्रायफ्रूट
कृती:
एका भांड्यात गूळ विरघळून घ्या. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, गूळ, दही, दूध, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करा.
एका अलुमिनियमच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये बनवलेले मिश्रण व ड्रायफ्रूट घाला. व वरतून चॉकलेट सॉस घाला.
विस्तवावर नॉन-स्टीक भांडे (पॅन) ठेवा व त्यामध्ये 2 वाट्या मीठ घालून 10 मिनिट गरम करायला ठेवा. भांडे चांगले गरम झाले की त्यावर एक स्टँड ठेवा. स्टँड (म्हणजे आपण गरम भांडे ठेवतो ती चाकी) ठेवून त्यावर केकचे भांडे ठेवा. भांड्यावर पॅनवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 40 मिनिट केक भाजून घ्या. 40 मिनिट झाल्यावर सुरीने केक झाला का चेक करा नाहीतर अजून 10 मिनिट ठेवा. मग विस्तव बंद करून 15 मिनिट तसाच थंड करायला ठेवा. पौस्टीक गव्हाच्या पिठाचा केक थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.
The Marathi language video of this cake recipe can be seen on our YouTube Channel – Healthy Eggless Wheat Flour Cake