पालक मेथी पौस्टीक पराठा मुलांच्या डब्यासाठी:
पालक व मेथी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कीती हितावाह आहे हे आपल्याला माहीत आहेच. मुले पाले भाज्या खायचा कंटाळा करतात किवा त्यांना पाले भाजी खायला आवडत नाही. पालक मेथीचा पौस्टीक पराठा बनवून बघा त्यांना नक्की आवडेल.
पालकह्या भाजीमध्ये जीवनस्त्व “A” , “B”, “C” व “E” तसेच प्रोटीन, फॉसफरस, कॅल्शियम व लोह असते. त्यामुळे पालक मेथी हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितावह आहे.
पालक मेथी पौस्टीक पराठा बनवतांना आवरणासाठी गव्हाचे पीठ व पालक वापरला आहे व सारणासाठी मेथी वापरली आहे. पालक मेथी पौस्टीक पराठा आपण नाश्त्याला किवा जेवणात किवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनीट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1/2 जुडी पालक अर्धी गड्डी
1 कप मेथी पाने (चिरून)
3 मोठे बटाटे
6-7 लसूण पाकळ्या
7-8 हिरव्या मिरच्या
1/2” आले तुकडा
मीठ चवीने
1 टी स्पून साखर व लिंबुरस
2 टे स्पून बेसन
2 कप गव्हाचे पीठ
2 टे स्पून तांदळाचे पीठ
तेल पराठा भाजण्यासाठी
कृती:
गव्हाच्या पीठात बेसन, तांदूळ पीठी, वाटलेला पालक, आले-लसूण-हिरवी मीरची (वाटून अर्धी घालावी) व मीठ घालूनघट्ट कणीक भीजवून बाजूला ठेवावी.
पालक धुवून चिरून उकळत्या पाण्यात घालावा. थंड झाल्यावर पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा. बटाटे उकडून सोलून गरम असताना किसून मळून घ्या. मेथी धुवून बारीक चिरून घ्या.
एका कढई मध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात आले-लसूण-हिरवी मिरचीची राहीलेली पेस्ट घालून चिरलेली मेथी घालून थोडी परतून त्यामध्ये उकडलेला बटाटा घालून मिक्स करून त्यामध्ये चवीने मीठ, लिंबूरस व साखर घालून मिक्स करून झाकून एक चांगली वाफ आणावी.
भिजवलेल्या कणकेचे एक सारखे 8 उंडे करून घ्या. एक उंडा घेवून पुरी सारखा लाटावा एमजी त्यामध्ये बनवलेले सारण घालून उंडा बंद करून पराठा हलक्या हातांनी लाटून घ्या.
तवा गरम झाल्यावर त्यावर पौस्टीक पालक मेथी पराठा तेल अथवा तूप घालून छान खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून घ्या.
गरम गरम पौस्टीक पालक मेथी पराठा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.