होममेड साऊथ इंडियन सांभर मसाला:
आपल्याला घरच्या घरी साऊथ इंडियन पद्धतीने होममेड सांभर मसाला बनवता येतो. सांभर मसाला बनवायला अगदी सोपा आहे. आपण नेहमी बाजारातून तयार सांभर मसाला आणतो त्यापेक्षा आपण घरी ताजा मसाला हवा तेव्हा बनवू शकतो.
साऊथ इंडियन डिश आता भारतभर प्रसीद्ध आहेत. सांभर आपण इडली, डोसा, मेदू वडा, उत्तप्पा बरोबर सर्व्ह करू शकतो. पण आपले सांभर छान चवीस्ट व टेस्टी झाले पाहीजे तसेच सांभर मसाला चवीला खमंग लागला पाहीजे.
सांभर मसाला बनवतांना आपण प्रमाणबद्ध साहीत्य घेवून बनवला तर अगदी साऊथ इंडियन स्टाईल आपला सांभर मसाला बनतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 1/4 कप बनतो
साहीत्य:
1 टे स्पून उडीददाळ
1 टे स्पून चणाडाळ
1 टे स्पून सुके खोबरे (किसून)
5-6 लाल सुक्या मिरच्या
1 टे स्पून धने
1/4 टे स्पून मेथी दाणे
8-10 काळे मिरे दाणे
कृती:
प्रथम कढई गरम करून घ्या. मग त्यामध्ये वरील सर्व साहीत्य मंद विस्तवावर कोरडे भाजून घ्या. खूप ब्राऊन करू नका.
साहित्य भाजून झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. सांभर बनवताना हा वाटलेला मसाला जेव्हडा जरूर असेल तेव्हडा वापरा व बाकीचा सांभर मसाला बाटलीत भरून ठेवा.
The Marathi language version of this Sambar Masala Recipe can be seen on our YouTube Channel – Homemade South Indian Sambar Masala