How to make 5 मिनिटात सरप्राइज केक बनवा Surprise Cake रेसिपी विडियो इन मराठी: सरप्राईज केक बनवतांना ब्रेड स्लाईस, विप क्रीम, फ्रूट जाम व चॉकलेट वापरले आहे. सरप्राइज केक आपण मुलांना नाश्त्याला देवू शकतो. मुलांना अश्या प्रकारचा झटपट सोपा व टेस्टी केक सर्व्ह करून सरप्राईज द्या.
मुले शाळेतून आल्यावर किंवा खेळून आल्यावर त्यांना भूक लागते. तेव्हा त्यांच्या आवडीचा केक बनवून द्या खुश होतील. ब्रेड स्लाईस, विप क्रीम, फ्रूट जाम व चॉकलेट हे साहित्य आपल्या घरी उपलब्ध असते. आपण फ्रूट जामच्या आयवजी कोणते सुद्धा सारण भरू शकतो. तसेच वरतून त्याला क्रीमने सजवल्यामुळे अगदी पेस्ट्री सारखे देसते तसेच त्याची टेस्ट सुद्धा पेस्ट्री सारखी लागते.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 1 जण
साहीत्य:
4 ताजे ब्रेड स्लाईस
1 कप विप क्रीम
2 टे स्पून मिक्स फ्रूट जाम
1 टे स्पून साखर, 3 टे स्पून पाणी
3-4 थेंब व्हनीला एसेन्स
2 टे स्पून डार्क चॉकलेट
चेरी सजवटी करीता
कृती:
ब्रेड स्लाईसच्या कडा कापून घ्या. चारी ब्रेड स्लाईस एक सारखे कापले पाहीजेत. एका वाटीत साखर व पाणी थोडे गरम करून साखर विरघळून घेतल्यावर थंड झाल्यावर व्हनीला एसेन्स घालून मिक्स करून घ्या.
विप क्रीम एका बाउल मध्ये काढून घ्या. डार्क चॉकलेट कंपाऊंड कीसून घ्या. जर डार्क चॉकलेट कंपाऊंड घरी नसेल तर आपले 5 स्टार चॉकलेट कीसून घ्या. फ्रूट जाम एका बाउलमध्ये काढून घ्या. जाम नसेल तर आपल्याला आवडेल ते मिकक्षर बनवा. (मी जामच्या आयवजी स्ट्रॉबेरी सॉस वापरला आहे.)
ब्रेड साईसला दोन्ही बाजूनी शुगर सीरप लावून घ्या. एक ब्रेडची स्लाईस घेवून त्यावर मिक्स फ्रूट जाम लावा त्यावर दुसरी ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर क्रीम लावा त्यावर तिसरी ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर परत मिक्स फ्रूट जाम लावा त्यावर चौथी ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर विप क्रीम लावा. आता चारही बाजूनी विप क्रीम चांगले लावून घ्या. वरच्या बाजूला किसलेले डार्क चॉकलेट घालून चेरीने सजवून 5 मिनिट फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
सरप्राइज केक पाच मिनिटात तयार झाला आता तो सर्व्ह करा.
The Marathi language video of the same cake recipe can also be seen on our YouTube Channel – Prepare a surprise cake in just 5 minutes