कार्तिक त्रिपुरी पूर्णिमा देव दिवाळी शंकर भगवान विष्णु भगवान उपवास महत्व फळ व नेवेद्यसाठी बेसनचा हलवा रेसीपी
कार्तिक पूर्णिमा 2019 ह्या वर्षी 12 नोव्हेंबर मंगळवार ह्या दिवशी आहे. कार्तिक पोर्णिमा ह्या दिवशी तुलसी विवाह समाप्ती त्रिपुरी पोर्णिमा व गुरु नानक जयंती सुद्धा आहे. 12 नोव्हेंबर 2019 मंगळवार हा दिवस खूप शुभ आहे. कार्तिक महिना हा फार शुभ मानला जातो. ह्या महिन्या मध्ये पुजा अर्चाचे खूप महत्व आहे. तसेच ह्या महिन्यात तुळशीचे खूप महत्व आहे.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी उपवास करून पुजा अर्चा करून दान धर्म केल्यास पुण्य मिळते. शंकर भगवान विष्णु भगवान तुलसी माता श्री कृष्ण ह्याची पुजा अर्चा करावी. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नान करणे, दीप दान करणे, हवन करणे, किवा यज्ञ करणे हे चांगले असते त्यामुळे आपली पापे निघून जातात. ह्या दिवशी अन्न, धन व वस्त्र दान करण्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी दान केल्याने त्याचा डबल लाभ मिळतो. तसेच असे म्हणतात की ह्या दिवशी दान केल्याने स्वर्ग मध्ये जागा मिळते. ह्या दिवशी बीना स्नानचे राहू नये.
महाराष्ट्रात कार्तिक महिन्यात रोज पहाटे प्रतेक देवळात काकड आरती म्हणतात म्हणजेच आरती म्हणून देवाला उठवतात. त्यानंतर संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत रामदास ह्याचे अभंग म्हटले जातात. ह्या दिवशी विठ्ठल मंदीरात मोठा उत्सव असतो. विठ्ठल राखूमाई ची भजने म्हणतात.
कार्तिक पूर्णिमा प्रारंभ 11 नोव्हेंबर 2019 सोमवार संध्याकाळी 06:01
समाप्ती 12 नोव्हेंबर 2019 मंगळवार रात्री 07:03
आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा ह्या दिवशीच्या उपवासाचे महत्व आहे. प्रतेक वर्षी 12 पोर्णिमा येतात. जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा 13 पोर्णिमा येतात. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवसाला त्रिपुरी पूर्णिमा किवा गंगा स्नान असे सुद्धा म्हणतात. ह्या पोर्णिमेला त्रिपुरी पूर्णिमा असे का म्हणतात कारण की ह्या दिवशी भगवान भोलेनाथ ह्यांनी त्रिपुरासुर ह्या नावाचा महाभयानक राक्षसाचा वध केला होता. म्हणून ह्या दिवशी श्री भोलेनाथ शंकर भगवान ह्याचे दर्शन घेतलेतर सात जन्म व्यक्ति ज्ञानी व धनवान होतो. ह्या दिवशी चंद्रोदय होत असताना त्या वेळी शिवा, संभूति, संतति, प्रीति, अनुसूया व क्षमा ह्या सहा गोष्टींचे पूजन केले असता शंकर भगवान ह्याची प्रसन्नता प्राप्त होते. ह्या दिवशी गंगा नदिमध्ये स्नान केले तर संपूर्ण वर्ष स्नान केल्याचे पुण्य मिळते. जर आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे.
कार्तिक पूर्णिमा त्रिपुरी पूर्णिमा देव दिवाळी ह्या दिवशी श्री भगवान विष्णु ह्यांनी प्रलय काळमध्ये वेदांचे रक्षण करून सृष्टिला वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता.
कार्तिक पूर्णिमा त्रिपुरी पूर्णिमा देव दिवाळी 12 नोव्हेंबर 2019 मंगळवार ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा तसेच असे म्हणतात की रात्री एक बछड़ा दान करावा पण हे आता शक्य नाही तर आपण अन्न करावे. जे कोणी ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून भगवान भोलेनाथचे भजन कीर्तन करतील त्यांना अग्निष्टोम यज्ञचे फळ प्राप्त होईल.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी देवी तुलसी ने पृथ्वीवर जन्म घेतला होता असे म्हणतात. कार्तिक महिन्यामध्ये विशेषतः श्री राधा व श्री कृष्ण ह्यांचे पूजन करायला पाहीजे. कार्तिक महिन्या मध्ये अन्न दान अवश्य करायला पाहीजे. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवसाला खूप महत्व प्राप्त आहे. ह्या पूर्णिमेला महाकार्तिकी पण म्हणतात. जर ह्या दिवशी भरणी नक्षत्र असेल तर त्याचे महत्व अजून वाढते. व जर रोहिणी नक्षत्र असेल तर त्याचे महत्व अजून काही पटीने वाढते. ह्या दिवशी जर कृतिका नक्षत्र वर चंद्र व गुरु असेल तर महापूर्णिमा म्हणतात.
कार्तिक पूर्णिमाचे महत्व:
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नान करणे, दीप दान करणे, हवन करणे, किवा यज्ञ करणे हे चांगले असते त्यामुळे आपली पापे निघून जातात. ह्या दिवशी अन्न, धन व वस्त्र दान करण्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी दान केल्याने त्याचा डबल लाभ मिळतो. तसेच असे म्हणतात की ह्या दिवशी दान केल्याने स्वर्ग मध्ये जागा मिळते. ह्या दिवशी बीना स्नानचे राहू नये.
गुरुनानक जयंती:
सिख लोकनमध्ये कार्तिक पूर्णिमा हा दिवस प्रकाशोत्सव म्हणून साजरा करतात. कारण ह्या दिवशी गुरु नानक ह्याचा जन्म दिवस आहे. गुरुनानक जयंती च्या दिवशी सिख लोक सकाळी लवकर उठून स्नान करून गुरूद्वारा मध्ये जावून गुरूवाणी आईकतात व त्यांच्या दाखवलेल्या रस्त्यावर चालतता.
स्वीट डिलिशीयस बेसनाचा हलवा
बेसनाचा शिरा बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बेसन (चणाडाळ पीठ)
१/२ कप ओला नारळ (खोवून)
१/४ कप तूप
४ कप दुध
1 कप साखर
थोडे ड्रायफ्रुट
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
एका नॉनस्टिक कढईमधे निम्मे तूप गरम करून त्यामध्ये बेसन घालून चांगले खरपूस भाजून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ घालून परत थोडे परतून घ्या.
दुध गरम करून घ्या. मग भाजलेल्या बेसनामध्ये हळूहळू घालून ढवळत रहा. घट्ट व्हायला आले की कढईवर दोन मिनिट झाकण ठेवा. दोन मिनिट झाली की झाकण काढा व साखर, ड्रायफ्रुट व वेलचीपूड घालून हलवत रहा घट्ट झाले की शिरा तयार झाला.
The video in the Marathi language of this article on Kartik Poornima and Dev Diwali can also be seen on our YouTube Channel- Dev Diwali and Kartik Purnima and Besan Halwa Bhog