मग केक माइक्रोवेव ओव्हनमध्ये 2 मिनिटात कसा बनवायचा
मग केक हा चहाच्या मग मध्ये बनवला आहे. झटपट व सोपा व मुलांना नक्की आवडणारा आहे. पण हा केक बनवल्यावर लगेच संपवावा लागतो. तसेच टेस्टी लागतो. मग केक बनवतांना कोको पावडर वापरली आहे आपण आपल्याला पाहीजे तो फ्लेवर वापरू शकतो.
मग केके बनवतांना मायक्रोवेव वापरला आहे त्यासाठी प्रिहीट करायची जजुरी नाही. मायक्रोवर सेट करून दोन मिनिटात केक बनवता येतो.
मग केक म्हणजे चहाचा मग (tea mug) ह्यामध्ये बनवलेला केक आहे. मुलांना शाळेतून किंवा खेळून आले की लगेच भूक लागते. व त्यांना छान त्यांच्या आवडीचे खायचे असते. तेव्हा अश्या प्रकारचा झटपट केक बनवून द्या बघा मुले कशी खुश होतात.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
बेकिंग वेळ: 2 मिनिट
वाढणी: 1 जणासाठी
साहीत्य:
4 टे स्पून मैदा
4 टे स्पून पिठी साखर
1 अंडे,
3 टे स्पून तेल
3 टे स्पून दूध
1/2 टी स्पून बेकिंग पावडर
1 टे स्पून कोको पावडर
एक चिमुट मीठ
2 थेंब व्हनीला एसेन्स
कृती:
एक मोठ्या आकाराचा मग घ्या म्हणजे ओव्हनमध्ये केक बाहेर येणार नाही. मग मध्ये एक अंडे फोडून त्यामध्ये तेल व दूध घालून काटे चमचानी चांगले फेटून घ्या.
मग त्यामध्ये मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर, कोको पावडर, मीठ व व्हनीला एसेन्स घालून फोर्कने चांगले फेटून घ्या.
माईक्रोवेव ओव्हनमध्ये माईक्रोवर हाय पॉवरवर 2 मिनिट सेट करून मधोमध मग ठेवून बेक करून घ्या.
गरम गरम मग केक मुलांना खायला द्या. कारण की हा गरमच चांगला लागतो.
The Marathi language video of this cake recipe can be seen here – How to make cake in tea mug in a microwave oven