20 मिनिटात बनवा स्वादीस्ट सोपी रवा नारळ वडी किवा वड्या
आपण जसे रव्याचे लाडू बनवतो तसेच आपल्याला सहज झटपट स्वादीस्ट रव्याची वडी बनवता येते. रव्याची वडी बनवतांना त्यामध्ये ओला नारळ वापरला आहे त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतीम लागते.
रवा नारळ वडी आपण दिवाळी फराळ साठी किवा सणावाराला किवा स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.. अश्या प्रकारच्या वड्या बनवायला सोप्या व लवकर होणार्या आहेत.
टीप: रवा वडी बनवतांना रवा जास्त भाजू नका कारण की बारीक रवा पटकन भाजला जातो. तसेच वड्या सुद्धा छान पांढर्या होतात म्हणजे अगदी खव्याच्या बर्फी सारख्या दिसतात.नारळ वापरण्याच्या आयवजी आपण खवा सुद्धा वापरू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनीट
वाढणी: 30 वड्या बनतात
साहीत्य:
2 कप बारीक रवा
1 कप ओला नारळ (खाऊन)
2 टे स्पून साजूक तूप
1 टी स्पून वेलची जायफळ पूड
3 कप साखर
कृती:
एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बारीक रवा मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. रवा जास्त भाजायचा नाही. रवा भाजत आला की त्यामध्ये ओला खोवलेला नारळ घालून परत 2-3 मिनिट भाजून घ्या.
रवा भाजून होईपरंत एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी घेवून पाक बनवायला ठेवा. पाक बनेस तोवर रवा भाजून होतो. पाक बनवतांना एक तारी बनवायचा. पाक बनवून झालाकी विस्तव बंद करून पाकामध्ये भाजलेला रवा घालून मिक्स करून घ्या मिश्रण थंड करायला ठेवा. अधून मधून मिश्रण हलवत रहा. मिश्रण थोडे कोमट असताना त्याच्या वड्या कापून घ्या.
किवा वड्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.