रेस्टोरेंट स्टाईल पारंपारिक शाही नॉनवेज बिर्याणी मसाला पाउडर
बिर्याणी म्हंटले की आपल्याला हॉटेल मधील छान खमंग टेस्टी लज्जतदार बिर्याणी डोळ्या समोर येते. बिर्याणीची टेस्ट त्याच्या मसाला वरून येते. जर मसाला छान खमंग झाला तर बिर्याणी एकदम रेस्टोरेंट स्टाईल बनते. बिर्याणी मसाला नेहमी ताजा बनवून वापरला तर बिर्याणीला वेगळीच चव येते. आपल्याला घरच्या घरी ताजी शाही नॉनवेज बिरयानी बिर्याणी मसाला पाउडर बनवता येते.
आपण घरी कधी सुद्धा अश्या प्रकारचा नॉनवेज बिर्याणी मसाला वापरुन पार्टीला किवा कधी सुद्धा बिर्याणी बनवू शकतो.
बिर्याणी मसाला पाउडर बनवतांना लवंग, दालचीनी, काळी मीरी, शहाजिरे, जायपत्री, हिरवे वेलदोडे वापरले आहेत. अश्या प्रकारचा बिर्याणी मसाला आपण अंड्याची बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, पनीर बिर्याणी, नॉन वेज किवा व्हेज बिर्याणी साठी वापरू शकतो.
पारंपारिक शाही नॉनवेज बिर्याणी मसाला पाउडर रेसिपी आपण आमच्या साईटवर येथे पाहू शकता:
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनीट
वाढणी: 50 ग्राम
साहित्य:
10 ग्राम लवंग
2-3 तुकडे दालचीनी
10 ग्राम काळी मीरी
5 ग्राम शहाजिरे
5 ग्राम जायपत्री
4-5 हिरवे वेलदोडे (सोलून)
कृती:
तवा किंवा कढई गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये लवंग, दालचीनी, मीरी, शहाजिरे, जायपत्री, हिरवे वेलदोडे कोरडेच गरम करून घ्या. खूप भाजायचे नाही फक्त गरम होई परंत भाजायचे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे.
बिर्याणी मसाला जेव्हडा पाहीजे तेव्हडा काढून घ्या मग बाकीचा घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
The video in the Marathi Language of this Biryani Masala can also be seen on our YouTube Channel – How to make Traditional Shahi Biryani Masala at Home