स्वयंपाक घरातील कानगोष्टी गृहीणीसाठी भाग २
आपण ह्या आगोदरच्या स्वयंपाक घरातील कानगोष्टी भाग 1 ह्या मध्ये काही उपयुक्त माहिती पाहिली आता दुसर्या भागा मध्ये सुद्धा अजून काही स्वयंपाक घरातील काही टिप्स बघणार आहोत.
तूप व लोणीचे पदार्थ, पिकनिकला जातांना जेवणाचे पदार्थ घ्यावयाची काळजी, ओले खोबरे, पुराण सैल झाले तर काय करायचे, ताक उरले तर काय करायचे, दहयातील कोशंबीर, आमसुल पूड, फ्लॉवर, कोबी, वांगी, भेंडी ह्या भाज्या बद्दल माहीती किवा टीप्स.
आपण अजून काही उपयुक्त माहीती ह्या पुढील भागामध्ये बघणार आहोत.
तूप किवा लोणी घातलेले पदार्थ एकदा उकळल्यावर पुन्हा उकळू नये. तसे केल्यास त्या पदार्थास तार येते व तो पचण्यास जड होतो.
सफरचंदाच्या फोडी मीठ व लिंबोणीच्या सौम्य द्रवणातून बुडवून काढल्यास त्या पिवळ्या पडत नाहीत. व त्यामुळे फ्रूट सॅलडची शोभा आणि चव वाढते.
पिकनिकला जातांना आपण सॅन्डविच बनवून घेतो तरते जास्त वेळ ताजे रहावेत ह्यासाठी लैटिस्च्या पानात गुंडाळून न्यावीत.
उन्हाळ्याच्या दिवसात ओले खोबरे घातलेले पदार्थ लवकर आंबतात तर ते आंबु नयेत म्हणून पदार्थ झाल्यावर ओले खोबरे घालावे.
एखाद वेळी पुराण सैल झाल्यास धुतलेल्या तांदळाचे 3-4 दाणे त्यात टाकल्यास पुराण आळून येते.
ताक शिलक राहिल्यास त्यामध्ये खूप पाणि घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही.
दह्यातील कोशिबीर शिलक राहिल्यास संध्याकाळ परंत ती फसफसते. तसे होऊ नये म्हणून ज्या दिवशी कोशबीर करायची त्याच्या आदल्या दिवशी दही फडक्यावर घालून व त्यातील पाण्याचा अंश निघून गेल्यावर ते दही कोशंबीर मध्ये घालावे.
आपण जेव्हा कोशंबीर बनवतो तेव्हा दही वापरतो तेव्हा फोडणी थंड करून घालावी गरम फोडणी घातल्यास कोशंबीरला पाणि सुटते.
आमसुल तेलात कडक होई परंत तळावी मग थंड झाल्यावर वाटून चिवड्यामध्ये घालावी. चिवडा मस्त लागतो.
थोड्या तेलात भेंड्या तळल्या तर त्याचा चिकट पणा जातो.
वांगी, फ्लॉवर, कोबी, भेंडी अश्या भाज्या शिजण्यापूर्वी जास्त वेळ चिरून ठेवू नये. कारण त्यातील एन्जाइम्स द्रव्य चिरल्यावर सुट्टे होवून हवेतील ऑक्सीजनशी मिसळते व त्यामुळे भाज्यामधील जीवनसत्व नाश होतात.
वांग्याचे भरीत बनवताना वांग्याला तेलाचा हात लावावा मग भाजून झाल्यावर भाड्याखाती झाकून ठेवावे. म्हणजे साल काढणे सोपे होते.
The video in the Marathi language of the same kitchen tips can be seen on our YouTube Channel – Simple Kitchen Tips for Ladies in Marathi-Part 2