सुपर लेमोनेड केक:
हा केक सध्या ओव्हनमध्ये बनवला आहे. सुपर लेमोनेड केक बनवतांना लिंबूरस व लिंबाची साले किसून घातली आहेत त्यामुळे केकची टेस्ट अप्रतीम लागते.
सुपर लेमोनेड केक बनवायला सोपा आहे. आपण घरी नाश्त्याला किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. तसेच मुलांच्या बर्थडे पार्टीला सुद्धा बनवू शकतो. लेमन केक घरी बनवला की त्याचा सुगंध खूप काळ पर्यंत राहतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
बेकिंग वेळ: 30 मिनिट
वाढणी: 6 जणासाठी
साहीत्य:
8 टे स्पून मैदा
7 टे स्पून पिठी साखर
6 टे स्पून लोणी किंवा वनस्पती तूप
1 टी स्पून बेकिंग पावडर
1 मोठे लिंबू, (लिंबू कीसून त्याची साल काढून)
2 टे स्पून दूध
3 अंडी
लेमन एसेन्स
कृती:
मैदा व बेकिंग पावडर तीन वेळा चाळून घ्या. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. लिंबू किसून त्याची साले बाजूला ठेवा. लिंबूरस काढून बाजूला ठेवा. अंडी फोडून काटे चमचानी फेटून घ्या.
एका बाउल मध्ये लोणी व पिठी साखर चांगली फेसून घ्या. मग त्यामध्ये फेसलेले अंडे घालून मिक्स करून घ्या. अंडे घातल्यावर मिश्रण नासल्यासारखे दिसेल्यावर त्यामध्ये मैदा घालून परत हलक्या हातानी फेसून घ्या. मग त्यामध्ये लिंबाची साले, लिंबू रस, लेमन एसेन्स घालून हलक्या हातानी मिक्स करून घ्या.
केकच्या भांड्याला आतून बटर पेपर लावा व त्यावर केकचे मिश्रण ओता. प्रथम ओव्हन गरम करून घ्या. मग त्यावर केकेचे भांडे ठेवून 30-35 मिनिट केक बेक करून घ्या.
The Marathi language video of this cake recipe can be seen on our YouTube Channel – Super Lemonade Cake