महाराष्ट्रियन स्टाईल पारंपारिक गोडा मसाला:
घरच्या घरी पुण्याचा प्रसिद्ध पारंपारिक गोडा मसाला पावडर अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो. गोडा मसाला बनवायला अगदी सोपा आहे झटपट होणारा आहे. आपल्याला अगदी बाजारात मिळतो तसा मसाला घरी बनवता येतो.
गोडा मसाला पावडर वापरुन आपण आमटी, मटकीची उसळ, भेंडीची भाजी, शिमला मिर्च, वालाची उसळ किवा भात अगदी टेस्टी बनवू शकतो. गोडा मसाला वापरताना थोडा गूळ वापरला की अजून छान टेस्ट येते.
गोडा मसाला बनवताना खाली दिलेल्या साहीत्य प्रमाणे बनवला तर अगदी टेस्टी बनतो. गोडा मसाला बनवतांना धने, जीरे, सुके खोबरे, तीळ, मीठ, लवंग, दालचीनी हिंग, हळद, लाल मिरची पावडर व तेल वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनीट
वाढणी: 1.250 किलो ग्राम
साहीत्य:
1/2 किलो ग्राम धने, 150 ग्राम जिरे
250 ग्राम सुके खोबरे (किसून)
250 ग्राम तीळ, 1/2 कप मीठ
1 टे स्पून लवंग, 1 टे स्पून दालचीनी
1 टे स्पून हिंग, 1 टे स्पून हळद
1 टे स्पून लाल मिरची पावडर
1/2 कप तेल
कृती: सर्व प्रथम कढई गरम करून मध्ये सुके खोबरे व तीळ लाईट ब्राऊन रंगावर भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
कढई मध्ये थोडे थोडे तेल गरम करून त्यामध्ये वेगवेगळे धने, जिरे, लवंग, दालचीनी भाजून त्यामध्ये हिंग, हळद, लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेवून मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मग त्यामध्ये वाटलेले खोबरे व तीळ घालून चांगले मिक्स करून घ्या.
गोडा मसाला थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
The video in Marathi of this Curry Masala Recipe can also be seen on our YouTube Channel – Recipe for Making Maharashtrian Goda Masala at Home