झटपट सोप्या पद्धतीने मूंग डाळ हलवा कसा बनवायचा
मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो तसेच त्याची टेस्ट अगदी अप्रतीम लागते. मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा म्हणजे बराच वेळ लागतो तसेच मुगाची डाळ भीजवून वाटून मग ती जास्त प्रमाणात साजूक तूप घालून भाजून हलवा बनवतात. हलवा बनवतांना आपण जेव्हडे तुपामध्ये भाजू तेव्हडा हलवा छान खमंग लागतो. पण भाजताना आपले हात दुखून येतात.
मुगाच्या डाळीचा हलवा अश्या पद्धतीने बनवला तर अगदी झटपट होतो व तूप पण अगदी कमी लागते. आजकाल सर्वजण आपल्या हेल्थ ची काळजी घेतात. अश्या प्रकारचा मुगचा हलवा कमी तुपात बनवून आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
बनवण्यासाठी वेळ: 15-20 मिनीट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप मूग डाळ
1 कप दूध
1कप फ्रेश क्रीम (साय)
1 कप साखर
1/4 कप साजूक तूप
1 टी स्पून वेलची पूड
1/4 कप काजू तुकडे / बदाम तुकडे / किसमिस
कृती:
एसआरव्ही प्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेवून पानी पूर्ण काढून टाका. एका जाड बुडाच्या कढईमध्ये तूप गरम करून घ्या मग त्यामध्ये धुतलेली मूग डाळ घालून सोनेरी रंगावर 5-7 मिनीट भाजून घ्या.
मुगाची डाळ भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच कढईमध्ये त्याच तुपात ड्राय फ्रूट थोडेसे भाजून घेवून बाजूला ठेवा.
भाजलेली मुगाची डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्याच कढईमध्ये त्याच तुपात वाटलेली डाळ घालून 2-3 मिनीट परत परतून घ्या. मग त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून मिक्स करून घ्या मग त्यामध्ये दूध घालून मिक्स करून मुगाची डाळ 2-3 मिनीट शिजू द्या. मग त्यामध्ये साखर व वेलची पावडर घालून 2-3 मिनीट मंद विस्तवावर ठेवा.
मुगाचा हलवा तयार झाला मग त्यामध्ये ड्राय फ्रूट घालून गरम गरम सर्व्ह करा.
The video in Marathi of this Halwa recipe can also be seen on our YouTube Channel – Instant Moong Dal Halwa