वास्तु शास्त्रा नुसार आपली बेडरूम अशी ठेवा त्यामुळे पती पत्नी मध्ये प्रेम संबंध कायम चांगले राहतील
आपण दिवसभराच काम करून थकून भागून घरी येतो. घरी आल्यावर आपण आपल्या बेडरूम मध्ये गेलो की आपला दिवस भराचा थकवा दूर होतो. त्यामुळे आपले शयन गृह आपल्या वास्तु शास्त्रानुसार असेल तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो व आपल्याला खूप प्रसन्न सुद्धा वाटते.
खूप वेळा असे सुद्धा होते की आपल्या बेडरूममध्ये सर्व सुविधा असून सुद्धा आपल्याला रात्री शांत झोप येत नाही. तसेच अस्वथ वाटते, सारखी जाग येते.
पती पत्नीचे शयन गृह नैऋत्य , दक्षिण अथवा पश्चिम दिशेस असेलतर अगदी फायदेमंद आहे. तसेच झोपायचा बेड दोन वेगळे किंवा दोन वेगळ्या गादया असतील तर दोघांमधील मत भेदाची दरी वाढवनार्या असतात. म्हणून एकच बेड असावा. नैऋत्य दिशेच्या बेड रूम वरती पती पत्नी चे वैवाहीक जीवन आवलंबून असते. नैऋत्य दिशेचे स्थान हे घरातील करत्या पुरषाचे शयन गृहचे स्थान आहे.
रात्री झोपताना डोके नेहमी भिंतीच्या बाजूला असावे व पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेच्या बाजूस असावे.
पती पत्नीचा एखादा प्रसन्न चीत्त फोटो पिवळ्या रंगाच्या फोटो फ्रेम मध्ये आपल्या शयन गृह मध्ये लावावा. त्यामुळे दोघान मधील प्रेम संबंध वाढून संसार सुखाचा होतो.
बेडरूम मध्ये निळा, काळा किंवा लाल रंग जास्त वापरणे टाळावे. पिवळा रंग किंवा गुलाबी रंग वापरणे उत्तम.
आपल्या बेडचे सरळ प्रतिबिंब पडेल असा आरसा शयन गृहात नसावा. समजा असेल तर त्या आरश्यावर पडदा लावावा. तसेच झोपल्यावर आपल्या पायाचे प्रतिबिंब आरश्यामध्ये दिसू नये.
काही लोकांची घरे लहान असतात व एकच खोली मध्ये सर्व म्हणजे किचन, बेड, देवघर असते. तेव्हा घरातील स्त्रीच्या पाळीच्या दिवसात चार दिवस पाळले जात नाहीत. तेव्हा अश्या वेळी चार दिवस देवाला शिवता येणार नाही ह्याची काळजी घ्यावी. किंवा देव घरास पिवळा पडदा लावावा.
आपल्या बेड रूम मधील बेड वर बाहेरील व्यक्तीस बसू देवू नये. कारण की त्या बाहेरील व्यक्तीची स्पंदने पलंगाचा वापर करणार्या घरातील व्यक्तीस घातक ठरू शकतात.
पती पत्नीच्या बेड रूम मध्ये फुलांचा गुच्छ ठेवणे शुभ असते. त्यामध्ये दोन फुले असावीत. पक्षांची फ्रेम असेलतर दोन पक्षी असतील अशी फ्रेम असावी. साधू पुरुषांची चित्रे बेड रूम मध्ये लावू नयेत.
आपल्या शयन गृहात आरसे जास्त नसावेत कारण की दिवसा आरसे सकारात्मकऊर्जा निर्माण करतात व रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
असे सुद्धा मानले जाते की बेडरुममध्ये लावलेली फ्रेम ,पोस्टर्स क्यलेंडर मध्ये पाणी, कारंजी, पाऊस नसावा. बेड रुम नेहमी स्वच्छ व नीटनेटकी ठेवा.
असे साधे सोपे उपाय करून बघा नक्की फायदा होईल व आपले मन प्रसन्न राहील.
The Marathi language video of these Vastu Shastra Tips can be seen on our YouTube Channel – Bed Room Layout as per Vastu Shastra for Happy Marital Relations