होम मेड बनाना बर्फी केळ्याची बर्फी
बनाना बर्फी म्हणजेच केळ्याची बर्फी बनवायला सोपी व चवीला मस्त लागते. केळ्याची बर्फी बनवायला जे साहीत्य लागते ते आपल्या घरी नेहमी उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला अश्या प्रकारची बर्फी कधी सुद्धा बनवता येते.
बनाना बर्फी आपण उपवासा साठी किंवा नवरात्रीमध्ये सुद्धा बनवू शकतो. सणावाराला किंवा स्वीट डीश म्हणून सुद्धा बनवू शकतो. बनाना बर्फी बनवण्यास फक्त पिकलेली केळी पाहीजे व दूध, साखर व नारळ पाहीजे.
The Marathi language video of this Burfi recipe can be seen here – Homemade Banana Burfi
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 15-20 वड्या बनतात
साहीत्य:
4 मोठया आकाराची केळी
2 कप दूध
1 1/4 कप साखर
1 कप नारळ (डेसिकेटेड)
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट सजवटी करीता
2 थेंब ऑरेंज कलर (एछीक)
कृती: प्रथम केळी सोलून घेवून ती कापून एका बाउलमध्ये घ्या मग ती चांगली कुस्करून घ्या थोडेसे दूध घालून कुस्करून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमध्ये दूध गरम करायला ठेवा, दूध गरम झालेकी त्यामध्ये कुस्करलेली केळी घालून मिक्स करून घ्या. मंद विस्तवावर मिश्रण ठेवा. मिश्रण घट्ट व्हायला 8-10 मिनिट लागतील.
केळी व दूधचे मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये साखर घालून परत घट्ट होईस तोवर शीजवून घ्या.
मग त्यामध्ये ऑरेंज कलर घालून वेलची पावडर व डेसीकेटेड कोकनट घालून मिस्क करून घ्या. पाहीजे असेलतर थोडी पिठीसाखर वापरुन मिक्स करून घ्या. मिश्रण चांगले घट्ट झाले पाहीजे.
एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यामध्ये मिश्रण घालून एक सारखे करून घेवून ड्रायफ्रूटने सजवा. मग फ्रीजमध्ये 2 तास सेट करायला ठेवा.
बनाना बर्फी सेट झाल्यावर त्याचे तुकडे कापून सर्व्ह करा.