क्रिसमस एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स रेसिपी
हेल्दी एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स ह्यामध्ये बनाना केळी, मैदा, ओट्स, दालचीनी, व्हेनिगर, अगदी कमी साखर वापरली आहे तसेच अगदी कमी तेल वापरले. बनाना ओट्स मफिन्स मुलांना खूप आवडतात त्यांना डब्यात द्यायला मस्त आहे. तसेच आपण क्रिसमस किवा नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सुद्धा बनवू शकतो.
मफिन्स आपण वेळवेगळ्या प्रकारे बनवता येतात. आपण नाश्त्याला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवता येतात. बनाना वापरल्या मुळे टेस्ट निराळीच लागते व साखर सुद्धा कमी लागते. ब्राऊन शुगरच्या आयवजी आपण साधी साखर सुद्धा वापरू शकतो पण ब्राऊन शुगरमुळे त्याची टेस्ट अजून छान लागते.
बनाना व ओट्स हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
बेकिंग वेळ: 30-35 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
3 मध्यम आकाराची पिकलेली केळी
1/2 कप दूध
1/4 कप ऑइल (कोणतेपण)
2 टी स्पून व्हनीला एसेन्स
1/4 कप ब्राऊन शुगर (किंवा नेहमीची)
1 1/4 कप मैदा
1/2 कप ओट्स
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
1/2 टी स्पून दालचीनी पावडर
पिंच मीठ
1 टे स्पून व्हीनीगर किंवा लिंबूरस
कृती:
ओव्हन प्रिहीट करून घ्या. ओट्स मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. एका मध्यम आकाराच्या बाउलमध्ये बनाना कुस्करून घ्या मग त्यामध्ये दूध, ऑइल, व्हनीला एसेन्स, साखर, चांगली मिक्स करून घ्या पाहिजे असेलतर हँड मिक्सर वापरा पण अगदी कमी स्पीडवर.
दुसर्या एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, ओट्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचीनी पावडर, मीठ घालून चाळून मिक्स करून त्यामध्ये दूध ऑइलचे मिश्रण घालून चांगले मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये व्हीनीगर किंवा लिंबूरस घालून परत हलक्या हातानी मिस्क करून घ्या.
ओव्हन प्रिहीट करून घ्या मग छोट्या छोट्या केकच्या साचात एक टे स्पून मिश्रण घालून वरतून ओट्स व ड्राय फ्रूट घालून सजवा. मफिन्सचे साचे ओव्हन मध्ये 30-35 मिनिट बेक करून घ्या.
गरम गरम हेल्दी एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स चहा बरोबर कॉफी बरोबर सर्व्ह करा.
The marathi language recipe of the same muffins recipe can be seen here – Eggless and Sugarless Muffins