अगदी सहज सोप्या मकर संक्रांत स्पेशल कोकणी पद्धतीने तिळाच्या वड्या
जानेवारी महिना आला की नव्या वर्षाचे सण सुरु होतात. मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील महिलांचा आवडता सण आहे. ह्या सणाला महाराष्ट्रात खूप महत्व आहे. संक्रांतीच्या दिवशी महिला आपल्या सुखी संसारासाठी पूजा करतात व संध्याकाळी हळदी कुंकू करतात. तेव्हा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनवायची प्रथा आहे. ह्या वड्या खूप छान लागतात.
तिळाच्या वड्या बनवताना थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत. तिळाच्या वड्या बनवतांना तीळ, शेंगदाणा कूट, सुके खोबरे गुळा आयवजी साखर वापरली आहे साखर वापरल्यामुळे वड्या तोंडात टाकल्या की लगेच वीरघळतात. अश्या प्रकारच्या तीळ वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत. तसेच दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात.
तिळाच्या वड्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४० वड्या
साहीत्य:
1 कप पांढरे तीळ
1/4 कप शेंगदाणा कूट
1/2 कप साखर (+ 1टे स्पून साखर जास्त)
1 टे स्पून सुके खोबरे (किसून)
1 टी स्पून वेलची पावडर
1/2 चमचा साजूक तूप
कृती:
कढई गरम करून घ्या त्यामध्ये तीळ घालून मंद विस्तवावर तीळ भाजून घ्या. त्यानंतर शेंगदाणे भाजून सोलून घ्या.
तीळ व शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. सुके खोबरे किसून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला साजूक तूप लावून घ्या.
कढईमध्ये साखर व 2 टे स्पून पाणी घालून मंद विस्तवावर दोन तारी म्हणजे थोडासा चिकट पाक बनवून घ्या.
साखरेचा पाक बनवून झालकी त्यामध्ये तिळाची पावडर, शेंगदाणे कूट व वेलचीपावडर घालूनचांगले मिक्स करून घ्या.
मिक्स करून झाल्यावर मिश्रण तूप लावलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये ओतून वरतून किसलेले खोबरे घालून घालून एक सारखे प्लेटमध्ये थापून घ्या.
थंड झाल्यावर शंकर पाळी सारख्या वड्या पाडाव्या. ह्या वड्या छान लागतात. कडक होत नाहीत.
The video of this Tilachi Vadi can be seen here – Maharashtrian Style Tilachi Vadi / Burfi