महाराष्ट्रियन स्टाईल तिळाची चटणी रेसिपी
आपल्या भारतात चटणीचे विविध प्रकार फार लोकप्रिय आहेत. चटणी हा प्रकार असा आहे की चटणीमुळे आपल्या तोंडाला चव येते. तसेच चटण्या ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. घरात भाजी नसेलतर आपण चटणी तोंडीला बनवू शकतो. आपण तीळ, शेगदाणा, जवस, काळे तीळ, खोबरे अश्या नानाविध प्रकारच्या चटण्या बनवू शकतो.
तिळची चटणी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे. थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन करणे हीतावह आहे. त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते. तिळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. तिळामध्ये विटामीन “B”, लोह, मँगनीज, सेलेनियम, फॉस्फरस आहे. तिळाचे नियमीत सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. तीळ हे गरम, कफकारक, पित्तकारक, बलदायक, केसांसाठी हितावह, त्वचेसाठी हितावह, दातासाठी हितावह, बुद्धीप्रद आहेत. तीळ व गूळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8-10 जणासाठी
साहीत्य:
2 कप तीळ (साधे पॉलिशचे वापराचे नाही)
1/2 कप सुके खोबरे
10-12 लसूण पाकळ्या
2 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून जिरे
1” चिंच
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
कृती: कढई गरम करायला ठेवा. तीळ निवडून कढईमध्ये मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. सुके खोबरे किसून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. लसूण सोलून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात भाजेलेले तीळ, भाजलेले सुके खोबरे, लसूण, लाल मिरची पावडर, जिरे, चिंच, साखर मीठ घालून चटणी बारीक वाटून घ्या. चटणी वाटून झाली की बाटलीत भरून ठेवा.
The Marathi language video of this Chutney Recipe can be seen here – Maharashtrian Style Tilachi Chutney