अगदी हॉटेल सारखी स्पायसी मिक्स वेज कोल्हापुरी रेसिपी
टेस्टी स्पायसी मिक्स वेज कोल्हापुरी हि भाजी महाराष्टात कोल्हापुर मधील खूप लोकप्रीय भाजी आहे तसेच आपल्याला कोल्हापुरी लवंगी मिरची खूप प्रसीद्ध आहे ते सुद्धा माहीत आहेच. उत्तर भारतात वेज कोल्हापुरी ही भाजी प्रतेक रेस्टौरंटमध्ये उपलब्ध असते.
टेस्टी स्पायसी मिक्स वेज कोल्हापुरी बनवायला सोपी व आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे. वेज कोल्हापुरी बनवतांना बटाटा, बीन्स, कॉलिफ्लॉवर, गाजर, मटार,शिमला मिर्च व टोमॅटो वापरला आहे. तसेच मसाला करीता सुके खोबरे, लाल मिरची, धने, जिरे, बडीशेप वापरली आहे.
टेस्टी स्पायसी मिक्स वेज कोल्हापुरी आपण घरी सर्व्ह करतांना नान, पराठा किवा चपाती बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 मोठ्या आकाराचा कांदा
1 मोठा टोमॅटो
1 मध्यम आकाराचे गाजर
1 छोटा बटाटा
6-7 फ्रेंच बीन्स
1 छोटी शिमला मिर्च
1 कप कॉलिफ्लॉवर तुरे
1/4 कप मटार
2 मध्यम आकाराचे टोमॅटो
1/2 कप फ्रेश क्रीम
1/4 कप कोथबीर
1 टी स्पून आले-लसूण पेस्ट
2 टे तेल भाजी करीता
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
मसाला करिता:
1/4 कप सुके किसलेले खोबरे
1 टी स्पून धने
1 टी स्पून जिरे
1 टी स्पून खसखस
1 टे स्पून तीळ
1 लाल कोल्हापुरी मिरची किवा काश्मीरी लाल मिरची पावडर
1/2” दालचीनी तुकडा
2 लवंग
1/2 मसाला वेलची
3-4 मीरे दाणे
1/4 टी हिंग
1/4 टी स्पून बडीशेप
6-7 काजू
कृती: प्रथम सर्व भाज्या धुवून गाजर व बटाटा सोलून त्याचे लांबट तुकडे कापून घ्या. कॉलिफ्लॉवरचे छोटे तुरे कापून घ्या. शिमला मिर्च लांबट चिरून घ्या. टोमॅटो चिरून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.
कढई गरम करून त्यामध्ये मसाला मंद विस्तवावर भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात भाज्या बुडेल तेव्हडे पाणी गरम करून घ्या. त्यामध्ये अगदी थोडेसे मीठ घालून त्यामध्ये बटाटा, मटार, बीन्स, गाजर व कॉलिफ्लॉवर घालून भाज्या अर्धवट शिजवून घ्या.
एका कढईमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये उकडलेल्या भाज्या 2-3 मिनिट परतून घ्या. भाज्या काढून बाजूला ठेवा. मग त्याच कढईमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या मग त्यामध्ये बडीशेप व आल-लसूण पेस्ट थोडी परतून घेऊन शिमला मिर्च व टोमॅटो घालून 2-3 मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये वाटलेला मसाला व हळद घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये उकडलेल्या भाज्या घालून मिक्स करून मीठ, 1/3 कप पाणी व फ्रेश क्रीम घालून मिक्स करून एक चांगली उकळी आणा. वरतून कोथबीरीने सजवा.
गरम गरम टेस्टी स्पायसी मिक्स वेज कोल्हापुरी पराठा, नान किवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
The Marathi video of this Kholapuri Bhaji recipe can be seen here – Hotel Style Kholapuri Mix-Veg Bhaji