लोकप्रिय 15 उखाणे महाराष्ट्रियन सणवार | समारंभ | लग्नाच्या दिवशी घेतले जाणारे इन मराठी
महाराष्ट्रियन महिला उखाणे घेण्यात अगदी पटाईत असतात. महाराष्टात घरी मंगल कार्य , काही समारंभ किंवा सणवार असेलतर उखाणा घेण्याची पद्धत आहे. उखाणा घेणे ही फार पूर्वीच्या काळा पासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी असे म्हणत की पतीचे नाव तसेच संगितले तर पतीचे आयुष्य कमी होते म्हणून उखाण्याच्या रूपात पतीचे नाव घेतले जायचे. उखाणा घेवून त्यामध्ये पतीचे नाव घालून आईकायला सुद्धा गंमत वाटते. तसेच प्रतेकीची कल्पना शक्ति सुद्धा वापरुन नाव घेतले जाते.
महाराष्टात नागपंचमी, मंगळागौर, लग्न, हळदी कुंकु ह्या सणांना माहीला खूप उत्साहाने उखाणे घेतात. असेच काही अगदी सोपे व मस्त उखाणे आहेत. तसेच लक्षात ठेवायला सुद्धा छान आहेत.
प्रथम आपण गमतीशीर खेडेगावात कसे उखाणे घेतात. जेथे X X X X आहे तेथे आपल्या पतीचे नाव घ्यायचे आहे.
1) “ ज्वारीचे पीक मोत्यांचे दाणे, भरल्या शेतातून XXXXXXX राव चालले पाटील राणे”
2) “ सोन्याच्या कर्णफुलांना मोत्यांचे झुबे, X X X X रावांची वाट पहात सारे गाव उभे”
महिलांचा आवडता सण म्हणजे नागपंचमी ह्या दिवशी सगळ्या जणी सजून रात्र जागवतात. तेव्हा आपले पारंपारिक खेळ खेळतात म्हणजेच फुगडी, झिम्मा, कोंबडा असे अनेक खेळ आहेत ते खेळ खेळतांना सुद्धा महिला उखाणा घेतात.
महाराष्टात नवीन लग्न झालेल्या नवरीची मंगळागौर करतात. त्या दिवशी सुद्धा रात्र जागवतात. तेव्हा सुद्धा पारंपारिक खेळ खेळतात. तेव्हा अश्या प्रकारचे उखाणे घेतात.
3) “ सुया बाई सुया पोलादी सुया, आम्ही दोघी फुगडी खेळू नणंदा भावजया ”
4) “ खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे, उंच उंच चिरे, तुझी माझी फुगडी गरगर फिरे ”
5) “ ह्या दारी त्या दारी फुलवली चवरी, फुलवली चवरी, भिऊ नकोग ताई उद्या होशील नवरी ”
6) “ पाऊस पडतो झिरीमिरी भिंती झाल्या काळ्या, भिंती झाल्या काळ्या, सोनाराच्या पोरींच्या लांब भिगबाळया ”
7) “ चिपाड बाई चिपाड, जोंधळ्याच चिपाड, दादांनी बायको केली आमच्या पेक्षा धीपाड ”
8) “ फुगडी खेळू दणादणा, रुपये मोजू खणा खणा, बाभळीचे साल, माझा कंबर पट्टा लाल ”
महाराष्ट्रात लग्न कार्य असले की नवी नवरी किंवा सौभाग्यवती स्त्री उखाणा घेते तेव्हा त्यामध्ये आपल्या पतीचे नाव अगदी लाजत घेते.
9) “ द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान X X X रावांच नाव गेते राखते तुमचा मान ”
10) “ शीतल चांदनं पडलं रामाच्या रथात X X X रावांच्या सह मी आहे संसार सुखात ”
11) “ कुलीन कुलात जन्मले, सुशील कुलात आले X X X रावांच्या जिवावर भाग्यशाली ठरले ”
12) “ सुपभर सुपारी मोजू कशी, गळ्यात ठुशी घालू कशी, पायात पैजण चालू कशी, आत्याबाई बसल्यात तुळशी पाशी X X X रावांच नाव घेते पोथीच्या पूजेच्या दिवशी”
13) “ आभाळ भरल पाण्यान, खळ भरल दाण्यान, मधी तिवडा गणराज X X X राव माझ्या दोरल्याच साज ”
महाराष्टात मुलीच्या लग्नात रुखवत देण्याची फार पूर्वी पासून पद्धत आहे. म्हणजेच मुलीच्या संसाराला उपयोगी वस्तु दिल्या जातात त्याला रुखवत म्हणतात. त्या सर्व वस्तु छान मांडून ठेवतात. तेव्हा काही उखाणे घेतात.
14) “ आला आला रुखवत दणाणल जोत, आत उघडून बघते तर निघाले साखरेच पोत ”
15) “ आला आला रुखवत पंढरीच्या ठायी, विठ्ठल करी आंघोळ रुक्मिणीधुते पायी , नऊ लाखांचा पितांबर नेसली नवर्याची आई”