घरगुती उपायाने आपली त्वचा सुंदर, नितळ, चमकदार कशी करायची
आजकाल पार्लर स्पा बाजारात ठीक ठिकाणी आहेत. पण ते खूप महाग आहेत. तेच उपाय आपण घरी केले तर आपल्याला पाहीजे तेव्हा व अगदी स्वस्तात करता येतात.
आपण आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी बरेच प्रयत्न करत. तसेच बरीच महागडी क्रीम सुद्धा वापरतो त्यांनी लगेच काय फरक पडेल असे नाही. त्यापेक्षा आपण घरगुती स्वस्त व मस्त उपाय करू या.
जो उपाय करायचा आहे तो अगदी साधा, सरळ व सोपा आहे. करून बघा नक्की फरक पडेल.
आपल्याला फक्त एक स्टीलची प्लेट किंवा वाटी, हळद, बेसन अथवा मक्याचे पीठ, दूध किंवा पाणी किंवा गुलाबजल घ्यायचे आहे. हळद, बेसन किंवा मक्याचे पीठ आपण बाजारचे वीकतचे रेडीमेड वापरायचे नाही कारण की त्यामध्ये भेसळ असू असु शकते. आपल्याला पाहिजे तर आपण चंदन पावडर सुद्धा मिस्क करू शकता,
हळद ही अत्यंत उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे. तिच्या सेवनाने रक्त शुद्ध होते. आपल्या महाराष्टात लग्नाच्या आधी नवरा व नवरीला हळद लावायची पद्धत आहे त्यामागचा हाच हेतु आहे की शरीराची कांती छान करायची. हळद ही जंतुनाशक व विषहारक आहे. त्यांनी त्वचा रोग बरे होतात.
एका वाटीत किंवा प्लेटमध्ये हळद, बेसन किंवा मक्याचे पीठ समप्रमाणात घेवून त्यामध्ये दूध किंवा पाणी किंवा गुलाबजल असेलतर घालून त्याची एक पेस्ट बनवून आपल्या उजव्या हातात ती वाटी धरून खाली एक सहज सोपा मंत्र आहे तो आपल्याला फक्त म्हणायचा आहे. मंत्र फक्त 21 वेळा म्हणा, मंत्र म्हंटल्यावर ती पेस्ट मंत्राच्या शक्तीने अभीमंत्रीत होईल. मग ती पेस्ट आपल्या तोंडाला, हाता पायाला लावावी. पेस्ट लावल्यावर 15-20 मिनिट तशीच ठेवावी. पेस्ट सुकल्यावर थंड म्हणजे आपल्या नळाच्या स्वच्छ पाण्याने आपले तोंड व हात पाय धुवावे. हात पाय व तोंड धुताना किंवा धुतल्यावर लगेच साबण वापरू नये.
सुंदर त्वचा करण्यासाठी आपण जास्त काही परीश्रम घेण्याची गरज नाही. हा उपाय आपण रोज करू शकता. त्यामुळे आपल्याला फायदा होईल.
मंत्र खाली देत आहे.
The Marathi language video of this Mantra Remedy can be seen here – Mantra for Fair and Lovely Skin