रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी टिकावू लेमन आईस क्युब लिंबू सरबत कसे बनवायचे
डिसेंबर व जानेवारी महिना आलाकी बाजारात छान ताजी हिरवी पिवळी लिंब येतात व आपल्याला बघता क्षणी आपल्याला लिंबू घ्यावेशे वाटतात, मग आपण लिंबूचे लोणचे, रस लिंबू किंवा आपण फ्रीजमध्ये उन्हाळ्यासाठी टिकवू लेमन स्क्वॅश बनवून ठेवू शकतो. ह्या सीझन मध्ये लिंबू स्वस्त सुद्धा असतात व एप्रिल मे महिन्यात लिंबू महाग होतात. जेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा आपण लेमन स्क्वॅश म्हणजेच लिंबू सिरप बनवून ठेवू शकतो.
समजा आपण लिंबाचा काही पदार्थ बनवायला घेतला व लिंबू रस जास्त किंवा थोडा उरला तर आपण त्याचे आईस क्युब बनवू शकतो. आपणा कडे लिंबू सुद्धा जास्त आहेत तरी आपण अश्या प्रकारचे लेमन आईस क्युब बनवू शकतो.
असे लेमन आईस क्युब आपल्याला जरूर असेल तेव्हा 2-3 क्युब घेवून आपण त्याचे लिंबू सरबत बनवू शकतो किंवा कोणत्या पदार्थामध्ये पण वापरायचे असेल तर वापरू शकतो.
लिंबू हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. लिंबू हे गुणकारी असून त्याच्या सेवनाने आपल्याला अनेक फायदे होतात. लिंबाच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्धी होते. पचन शक्ति चांगली होते.शरीरातील उष्णता कमी होते. संसर्गजन्य रोग होत नाहीत. सर्दी नाहीशी होते. लिंबामुळे आपली शरीराची कांती सुधारते, त्वचा चांगली होते व केस चमकदार होतात.
त्रिदोष, अग्नि, क्षय, वायु विकार, विष, मलाविरोध, व कॉलरामध्ये लिंबू खूप गुणकारी आहे. कृमी दूर करण्याचे गुण लिंबामध्ये आहे. रक्त दोष व त्वचारोगमध्ये ही लिंबू गुणकारी आहे. लिंबामध्ये विटामीन “C” भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते.
गुणकारी लिंबूचे रोज सेवन केल्याने आपल्या शरीराला चांगले फायदेच होतात. आता आपण लेमन आईस क्युब कसे बनवायचे ते बघू या.
1) डिप फ्रीजमध्ये लेमन आईस क्युब बनवून ठेवा.
प्रथम लिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्या. मग एक लिंबू घेवून त्याचे दोन भाग कापून घ्या. अश्या प्रकारे सर्व लिंब कापून घेवून त्याचा रस काढून घ्या. लिंबाचा रस गाळून घ्या. म्हणजे बिया निघून जातील. मग आईस ट्रे घेवून त्यामध्ये काढलेला लिंबाचा रस एक सारखा ओतून घ्या.
2) लिंबाचा रस ओतून झाल्यावर आईस ट्रे डिप फ्रीजमध्ये 8 तास सेट करायला ठेवा. म्हणजे क्युब छान कडक बनतील व ट्रे मधून काढतांना तुटणार नाही.
3) लेमन आईस क्युब चांगले सेट झाल्यावर काढून घ्या. समजा क्युब चांगले सेट नाही झालेतर परत ट्रे 2 तास डिप फ्रीजमध्ये ठेवा. मग सगळे क्युब व्यवस्थीत काढून घ्या.
4) एक चांगल्या क्वालिटीची प्लॅस्टिक पिशवी घेवून त्यामध्ये लेमन आईस क्युब ठेवा. प्लॅस्टिक पिशवी चांगले बंद करा.
5) लेमन आईस क्युबची पिशवी परत डिप फ्रीजमध्ये ठेवा. व आपल्याला पाहीजे तेव्हा पाहिजे तेव्हडे लेमन आईस क्युब घेवून त्याचे लिंबू सरबत किंवा भाजी आमटी मध्ये घालायचे असतील तर घालू शकता. प्लॅस्टिक च्या पिशवीवर ज्या दिवशी क्युब बनवले आहेत ती तारीख लिहून ठेवा.
The Marathi language video of this Nimbu Iced Cubes recipe can be seen here – Immunity Boosting Iced Lime Cubes Video in Marathi